पंढरपूर सिंहगडच्या आकाश कट्टेची ४ कंपनीत निवड* *वार्षिक १० लाख पॅकेजची नोकरी*

 *पंढरपूर सिंहगडच्या आकाश कट्टेची ४ कंपनीत निवड*

*वार्षिक १० लाख पॅकेजची नोकरी*



पंढरपूर: प्रतिनिधी

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्टॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरींग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेला जत, जि.सांगली येथील आकाश चंद्रशेखर कट्टे यांची ४ कंपनीत निवड झाली असल्याची माहिती इलेक्टॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरींग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्टॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरींग विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असतानाच आकाश चंद्रशेखर कट्टे याचे पाथवेज टू पॅरंटहूड या अमेरिकन कंपनीमध्ये (वार्षिक पॅकेज १० लाख), कॉग्नीझंट (वार्षिक पॅकेज ४ लाख), रिझयूमॅक्स (वार्षिक पॅकेज ३ लाख), स्प्रायआयक्यू टेक्नॉलॉजीज (वार्षिक पॅकेज ३ लाख) आदी ४ कंपनीत निवड झाली असून आकाश कट्टे हा पाथवेज टू पॅरंटहूड या अमेरिकन कंपनीमध्ये ऑनलाईन माध्यमातून रुजू झाला आहे.

“पाथवेज टू पॅरंटहुड” ही अमेरिकेतील सल्लागार संस्था असून नोकरी करणारे पालक, काळजीवाहू व्यक्ती आणि त्यांच्या नियोक्त्यांना वैयक्तिकृत मार्गदर्शन व सहाय्य प्रदान करते. काम करणाऱ्या पालकांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासोबतच त्यांच्या करिअर प्रगतीसाठी ही संस्था कार्यरत आहे.

तृतीय वर्षातच विद्यार्थ्यांना प्री-प्लेसमेंट ऑफर मिळवून देणारे पंढरपूर सिंहगड हे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे. दरवर्षी विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयाला भेट देत असतात. अल्पावधीतच महाविद्यालयाने उत्कृष्ट व दर्जेदार कॅम्पस प्लेसमेंटची परंपरा निर्माण केली आहे.

विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रासाठी सक्षम बनविण्याच्या उद्देशाने महाविद्यालयामार्फत विविध कौशल्यविकास उपक्रम सातत्याने राबविले जातात. तांत्रिक प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल्स, मॉक इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन, कोडिंग प्रॅक्टिस, एप्टिट्यूड ट्रेनिंग, इंडस्ट्री एक्स्पर्ट सेशन्स, करिअर गाईडन्स व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळांद्वारे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण ग्रूमिंग केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना उच्च पगाराच्या नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळविण्यास मोठी मदत होत आहे.

आकाश कट्टे याच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांच्यासह डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ. अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. वैभव गोडसे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.