स्वेरी मध्ये ‘कॅम्पस टू कॉर्पोरेट’ व ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रॉम्प्ट’ या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांचे उदघाटन



स्वेरी मध्ये ‘कॅम्पस टू कॉर्पोरेट’ व ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रॉम्प्ट’ या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांचे उदघाटन



पंढरपूर : गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मधील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या वतीने इंजिनिअरिंगच्या सर्व विभागांतील अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार, दि.१८ जून २०२६ पासून ते मंगळवार, दि.२३ जून २०२६ पर्यंत एक आठवड्याच्या ‘कॅम्पस टू कॉर्पोरेट’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रॉम्प्ट’ या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमास उत्साहात प्रारंभ झाला आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात करिअर करताना उद्योग क्षेत्रांच्या अपेक्षांनुसार सक्षम बनविणे, रोजगारक्षम कौशल्यांचा विकास करणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करून भविष्यात शिक्षण देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमांचे स्वेरीमध्ये नुकतेच उदघाटन झाले. 

          संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार व विविध विभागांच्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या हस्ते व सर्व विभागप्रमुखांच्या उपस्थितीत हे उदघाटन झाले. याप्रसंगी उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांनी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राच्या अपेक्षांनुसार आवश्यक कौशल्ये विकसित करून प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी आवाहन केले तसेच यासाठी नियमित उपस्थिती, शिस्त आणि सक्रिय सहभाग याद्वारेच विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होतील असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील कार्यसंस्कृती, व्यावसायिक दृष्टिकोन, कार्यालयीन शिष्टाचार, प्रभावी संवादकौशल्य, व्यावसायिक पत्रव्यवहार, संघर्ष व्यवस्थापन, वाटाघाटी कौशल्य, संघभावना, नेतृत्वगुण, विविध संस्कृतींमध्ये काम करण्याची तयारी, आंतरवैयक्तिक संबंध, वेळेचे नियोजन, आत्मविश्वास विकास तसेच व्यावसायिक वेशभूषा व व्यक्तिमत्त्व विकास यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जात आहे. यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), जनरेटिव्ह एआय, लार्ज लँग्वेज मॉडेल्स, चॅट जीपीटीचा प्रभावी वापर, प्रभावी प्रॉम्प्ट तयार करण्याची पद्धत, शैक्षणिक व व्यावसायिक कामांसाठी एआयचा वापर, ई-मेल व अहवाल लेखन, उत्पादकता वाढविण्यासाठी एआयचा उपयोग, माहितीची गोपनीयता, कृत्रिम बुद्धिमत्तेतील नैतिकता आणि भविष्यातील संधी याविषयी सखोल प्रशिक्षण दिले जात आहे. प्रमुख पाहुणे अॅस्पायरिंग माइंड्सचे प्रशिक्षक विनेश खेर यांनी विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट क्षेत्रातील माहिती दिली. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. रविराज माढेकर व डॉ.अभिषेक यांच्या नियोजनातून प्रशिक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार तसेच प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. रविराज माढेकर यांनी विविध प्रशिक्षण वर्गांना भेटी देऊन प्रशिक्षण सत्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नियमित उपस्थिती, सक्रिय सहभाग आणि उद्योगाभिमुख कौशल्ये आत्मसात करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थी व प्रशिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, उद्योग क्षेत्राच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यासाठी स्वेरी इंजिनिअरिंगमध्ये सातत्याने अशा रोजगाराभिमुख व कौशल्यवर्धक उपक्रमांचे आयोजन करत असल्याची माहिती प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागामार्फत देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.