एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रा. अंजली पिसे यांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विषयातून पदवी प्राप्त

 एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रा. अंजली पिसे यांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विषयातून पदवी प्राप्त



पंढरपूर : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (E&TC) विभागातील प्राध्यापिका सौ. अंजली चेतन पिसे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली की आहे. 

त्यांच्या संशोधन कार्याचे शीर्षक "एनर्जी एफिशियंट ऑप्टिमल क्लस्टर बेस्ड राऊटिंग प्रोटोकॉल इन व्हेहिक्युलर अ‍ॅड-हॉक नेटवर्क्स"असे आहे. या संशोधनात VANETs साठी ऊर्जा-कार्यक्षम क्लस्टर-आधारित राउटिंग प्रोटोकॉल विकसित करण्यात आला असून, वाहनांची गती, स्थान, ऊर्जा आणि कनेक्टिव्हिटी यांच्या आधारे क्लस्टर हेड निवडून डेटा संप्रेषण अधिक कार्यक्षम करण्यात आले. यामुळे ऊर्जा वापर कमी झाला, पॅकेट वितरण दर वाढला, विलंब कमी झाला आणि नेटवर्कचे आयुष्य वाढले.

संशोधनाच्या कालावधीत सौ पिसे यांनी महत्वपूर्ण संशोधन पेपर प्रकाशित केले असून त्यांना या अभिनव कल्पनेवर आधारित पेटंट प्राप्त झाले आहे 

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरींग, कोर्टी, पंढरपूर या रिसर्च सेंटर मधून मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशामुळे महाविद्यालय, विभाग तसेच संपूर्ण सिंहगड परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संशोधन क्षेत्रातील त्यांची जिद्द, कठोर परिश्रम, समर्पण आणि सातत्यपूर्ण अभ्यास यामुळे त्यांनी ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी प्राप्त केली आहे.


या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य व संचालक डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ.अल्ताफ मुलाणी, सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांसाठी त्यांचे हे यश प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.


सौ. अंजली पिसे यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad