सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात “पायथॉन फॉर स्मार्ट आयओटी अँड एआय ॲप्लिकेशन्स” विषयावर कार्यशाळा*

 *सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात “पायथॉन फॉर स्मार्ट आयओटी अँड एआय ॲप्लिकेशन्स” विषयावर कार्यशाळा*



पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग आणि इनोव्हेशन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १२ मार्च २०२६ रोजी “पायथॉन फॉर स्मार्ट आयओटी अँड एआय ॲप्लिकेशन्स” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल माहिती दिली.

या कार्यशाळेसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून श्री. रविकिरण लोखंडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पायथॉन प्रोग्रामिंगचा वापर स्मार्ट आयओटी प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अनुप्रयोगांमध्ये कसा केला जातो, तसेच आयओटी डिव्हाइसेसकडून मिळणाऱ्या डेटाचे संकलन, प्रक्रिया, विश्लेषण आणि क्लाउडवर साठवणूक याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणे व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून पायथॉन वापरून स्मार्ट अॅप्लिकेशन्स विकसित करण्याची प्रक्रिया शिकवण्यात आली. यामध्ये स्मार्ट होम डिव्हाइसेस, डेटा लॉगिंग, रिअल-टाइम मॉनिटरिंग तसेच एआय बेस्ड प्रेडिक्टिव्ह मॉडेल्स या संकल्पनांचा समावेश करण्यात आला. या व्यावहारिक सत्राने विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी दिली.

कार्यशाळेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी आणि प्रा. सोनाली गोडसे यांनी केले, तर विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य या कार्यशाळेस मिळाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad