राज्यप्रवक्ते रणजीत बागलांचा स्वाभिमानीला जय महाराष्ट्र:

 राज्यप्रवक्ते रणजीत बागलांचा स्वाभिमानीला जय महाराष्ट्र: ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश



स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या राज्य प्रवक्ते रणजीत बागल यांनी पदाचा राजीनामा दिला असून मुंबई मातोश्री येथे उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

बागल यांनी कालच च ईमेलद्वारे स्वाभिमानी मध्यवर्ती कार्यालयास पाठविला होता. `` अवघ्या काही वेळाने मी एक नवी राजकीय वाटचाल सुरू करत आहे. आदरणीय राजु शेट्टी साहेबांनी माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला राज्याच्या महत्वपूर्ण पदाची आजवर जबाबदारी दिली याबद्दल ऋणातून उतराई होणे शक्य नाही, परंतु योग्य वेळी योग्य निर्णय हे घ्यावे लागतात.. आपल्या सर्वांचे सहकार्य असे मिळत राहील ही अपेक्षा व्यक्त करून थांबतो.. धन्यवाद.. जय महाराष्ट्र..`` असे म्हटले होते.

रणजीत बागल हे युवा कार्यकर्ते असून ते खंदे राजु शेट्टी सर्मथक होते. हातकणंगले लोकसभा मतदार संघातून राजू शेट्टी यांचा पराभव झाल्यानंतर बागल प्रचंड अस्वस्थ झाले होते. खासदार राजू शेट्टी यांची प्रतिमा ‘शेतकऱ्यांचा हक्काचा नेता’ अशीच आहे. राज्यासह देशभरातील अनेक शेतकरी आंदोलनांचं नेतृत्त्व राजू शेट्टी यांनी केले आहे. लोकवर्गणीतून निवडून येणारा आणि शेतकरी-कष्टकऱ्यांच्या प्रत्येक हाकेला धावून जाणारा नेता म्हणूनही राजू शेट्टींची ओळख आहे. ऊसदराचा प्रश्न असो वा शेतीशी संबंधित इतर कुठलाही प्रश्न असो, राजू शेट्टी रस्त्यावर उतरण्यास तयार असतात. अशा नेत्याचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. त्याचेच प्रतिबिंब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रणजित बागल यांनी पोस्ट लिहून व्यक्त केलं होतं.

मध्यंतरी रणजित बागल यांनी विधानसभा निवडणुकांपूर्वी स्वाभिमानीची नेते रविकांत तुपकर यांच्या सोबत त्यांनी रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासोबत जात भाजपशी जवळीक केली होती. परंतू ताबडतोब तुपकर आणि बागल यांनी रयतची साथ सोडून पुन्हा स्वाभिमानीची कास धरली होती.

 माजी खासदार राजू शेट्टी यांनी रणजित बागल यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या राज्य प्रवक्तेपदी नेमले होते. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि विविध राजकीय मुद्द्यावर ते सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतातात. योग्य वेळी योग्य निर्णय हे घ्यावे लागतात.. आपल्या सर्वांचे सहकार्य असे मिळत राहील ही अपेक्षा व्यक्त करून रणजीत बागल यांनी उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad