पत्रकार वारिसे यांच्या हत्त्याच्या निषेरधार्थ लोहा तहसीलदाराना निवेदन
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार*
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ व पत्रकारावर वारंवार होत असलेल्या हल्याच्या निषेध करण्यासाठी लोहा तालुका पत्रकार संघाच्या वतीने आरोपीला फाशी ची शिक्षा द्या मयत पत्रकाराच्या कुटूंबियांना 50 लक्ष रु ची तात्काळ मदत करा आशा आशयाचे निवेदन 10 फेब्रुवारी रोजी तहसीलदार यांना देण्यात आले
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांनी बातमी का छापली म्हणून गाडी खाली घालून निर्घृण हत्या करण्यात आली. त्या घटनेच्या निषेधार्थ व पत्रकारांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी शुक्रवार .10 फेब्रुवारी रोजी राज्य भरात काळ्या फिती लावून निदर्शन करण्यात आले. त्याच अनुषंगाने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोहा तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
. या वेळी पत्रकारांनी तहसीलदार यांना निषेधाचे निवेदन देवून मयत पत्रकार वारिशे यांच्या कुटुंबास शासनाने 50 लक्ष आर्थिक मदत करावी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली.
या वेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य जेष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे प्रभारी जिल्हा अध्यक्ष डी एन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निषेधार्थ चे निवेदन देण्यात आले
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश महाबळे जिल्हा उपाध्यक्ष केशव पाटील पवार तालुका अध्यक्ष जगदीश पाटील कदम ,शेख मुर्तुजा शेख युनूस प्रवीण महाबळे गोविद पाटील पवार ,बाळासाहेब कतुरे ,फेरोज मणियार ,मीडिया पोलीस सोशल क्लब संघटनेचे तालुका अध्यक्ष विलास सावळे विजय चन्नावार गणपत जामगे विनोद महाबळे , संपादक प्रेस फोरम संघटनेचे तालुका अध्यक्ष शिवराज पाटील पवार संजय कहाळेकर जेष्ठ पत्रकार साहेबराव सोनकांबळे बापू गायखर गोविद कदम ,प्रदीप कांबळे संतोष तोंडारे बाळासाहेब बुद्ध, महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष संतोष चेउलवार, उपाध्यक्ष शुभम सावकार उतरवार, कोषाध्यक्ष सयद अकबर , शहराध्यक्ष किरण दाढेल आदी च्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत