*किनवटच्या नागरिकांकडून न.पा.प्रशासक तथा तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव यांचे कौतुक...*
*प्रतिनिधी किनवट विशाल भालेराव*
अनेक वर्षांपासून गाढवे, कुत्रे, घोडे, डुकरे व मोकाट जनावरे व इतर प्राणी किनवट च्या मुख्य रस्त्यावर ठाण मांडून बसत असतात किंवा इतरत्र भटकत असताना अनेक अपघात घडून गेलेत. परंतु गेल्या अनेक वर्षापासून कोणतेही नगराध्यक्ष व नगरसेवकांना याचे भान नव्हते. अनेकदा किनवट नगर वाशीयांनी नगराध्यक्षांना निवेदन दिली. परंतु याकडे कुणीही ढुंकून न पाहता फक्त कामाची %वारी कशी काढता येईल याकडेच सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष प्रशासनाचे लक्ष लागून होते. सामन्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला पाच वर्ष वेळच नव्हता.
परंतु अवघ्या आठदिवसाच्या कार्यकाळात किनवट नगर पालिकेच्या प्रशासक पदी किनवटच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव यांनी सूत्रे हाती घेताच अनेक योग्य निर्णय हाती घेताना दिसून येत आहेत. वर्तमानपत्रे व सोशल मीडियाद्वारे मोकाट जनावरांच्या बातम्या प्रसिद्ध होताच किनवट करायसाठी एक योग्य निर्णय घेण्यात आला. व लगेच कोंडवाडा तयार करून त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन मोकाट जनावराची धार पकड करून मध्ये टाकण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांच्या मालकांचे धाबे दणाणले आहेत. यापुढे मोकाट रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांना कोंडवाड्यात डांबून त्यांच्या मालकाकडून दंडा कारल्या जाणार आहे. त्यामुळे किनवट शहरातील जनावरांच्या व प्राण्यांच्या मालकांनी आपापले जनावरे बांधून ठेवावीत किंवा रस्त्यावर फिरणार नाहीत याची दक्षता घ्यावी. जनतेने आपापल्या पाळीव प्राण्याची दक्षता घ्यावी व होणारा आर्थिक भुर्दंड टाळावा असे आवाहन किनवटच्या प्रशासक डॉक्टर मृणाल जाधव यांनी जनतेला केले आहे. सुरू असलेल्या कारवाईमुळे किनवटच्या नागरिकांकडून न.पा.प्रशासक तथा तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव यांचे कौतुक होत आहे.
प्रतिनिधी किनवट विशाल भालेराव