शंकरनगर येथील अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करणाऱ्या विरुद्ध रामतीर्थ पोलिसात पोस्को गुन्हा दाखल..

 शंकरनगर येथील अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करणाऱ्या विरुद्ध रामतीर्थ पोलिसात पोस्को गुन्हा दाखल.. 



नायगांव ता.प्र. 

(परमेश्वर पा.जाधव)


     संत ज्ञानेश्वर विद्यालय धूपा (शंकरनगर ) येथील शाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत ओळख करून तिला लग्नाचे आमिष दाखवून सुमारे दोन वर्षापासून तिचे बळजबरी लैंगिक शोषण करणाऱ्या शेळगाव गौरी तालुका नायगाव येथील अविनाश गणपतराव वाढवणे यांच्या विरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती ऍक्ट सह पोस्को गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बिलोली येथील पोलीस उपविभागीय अधिकारी अर्चित चांडक हे करीत आहेत.

         सविस्तर माहिती अशी की शंकरनगर येथील सामान्य कुटुंबातील मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील एका अल्पवयीन असलेल्या संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी सोबत शेळगाव गौरी तालुका नायगाव खैरगाव येथील अविनाश गणपतराव वाढवणे यांनी सुमारे दोन वर्षापासून ओळख निर्माण करून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे बळजबरी लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना दिनांक 16 जानेवारी रोजी समोर आली आहे.

            याप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी संकेत दिघे यांनी या घटनेची सविस्तर माहिती वरिष्ठांना कळवून या घटनेतील संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पीएसआय इंगळे पाटील आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे यांना तपास काढून आरोपींना शोधण्यासाठी पाठवले असताना तो पुणे शहराकडे गेल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्याने सपोनी संकेत दिघे यांनी भोसरी ,यवत, भिगवन आणि इंदापूर येथील पोलिसांना सदरील आरोपी विषयी माहिती दिली असता इंदापूर पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊन रामतीर्थ पोलिसाच्या स्वाधीन केले.सदरील प्रकरणातील फरार आरोपी 12 तासात रामतीर्थ पोलिसांनी जेरबंद करून पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 17 जानेवारी रोजी शेळगाव गौरी येथील अविनाश गणपतराव वाढवणे यांच्या विरुद्ध गु .र. न .6/2023 कलम 376, 376,(2) ( N ) (376 ) ( 3 ) सह कलम 4,6,8,12 पोस्को ऑक्ट ( 3 ) ( 2 ) ( S ) 

भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास बिलोली येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चीत चांडक हे करीत आहेत.   

        शंकरनगर हे शिक्षणाचे माहेरघर असून ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शिक्षण घेण्यासाठी येथे येणाऱ्या अनेक अल्पवयीन मुलींना असे टवाळखोर प्रेमाच्या नादी लावून अनेक मुल्याचे जीवन उध्वस्त करत असल्याचे दिसून येत असल्याने पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा टवाळखोर मुलांना वेळीच आवर घालणे गरजेचे असल्याचे सुजान नागरिकांतून बोलले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad