छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवा अन्यता आमरण उपोषण- शरद पाटील पवार अन्यथा 6 फेब्रुवारीपासून नगरपालिका समोर अमर उपोषण

 छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवा अन्यता आमरण उपोषण- शरद पाटील पवार


अन्यथा 6 फेब्रुवारीपासून नगरपालिका  समोर अमर उपोषण


* नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 



लोहा शहरात  छत्रपती शिवाजी महाराज चौक येथिल  लोकवर्गणी मधुन आणलेला  छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा नियोजित जागी बसवण्यात यावा अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शरद पवार यांनी केले आहे.आज लोहा येथील सरदार सॉ मिल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.सुरुवातीला लोहा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सोनू संगेवार यांनी प्रस्थावना करत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोहा येथे नियोजीत जागी बसवावा अशी मागील बऱ्याच वर्षा पासुन तमाम शिव प्रेमीची इच्छा आहे.



 छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्याच्या संदर्भात शासन दरबारी सर्व कायदेशीर प्रक्रिया व मान्यता पुर्ण झाल्या असुन सदरील शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेवुन लोक वर्गणीतून नियोजीत ठिकाणी बसवण्यासाठी पुतळा भेट म्हणुन आणला होता पण तो तुम्ही यापुर्वी आपल्या कार्यालयाच्या वतीने आचार संहितेचे कारण दाखवुन ताब्यात घेतला आहे व त्यास बंदीस्त करुन नगर परिषदेच्या जागेत ठेवण्यात आला आहे. तरी सदरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दि. १९ फेब्रुवारी २०२३ ( शिवजन्मोत्सवा) पूर्वी नियोजीत जागी सन्मानाने पुतळा बसविण्यात यावा अन्यथा दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी नगर परिषद कार्यालय, लोहा समोर तमाम शिवप्रेमींच्या वतीने व समवेत अमरण उपोषण करण्यात येईल. होणाऱ्या सर्व अनुचीत प्रकारास आपण व प्रशासन सर्वतोपरी जबाबदार असेलउपोषण कर्ता

शरद पाटील पवार,पंकज रतनसिंह परिहार,माजी नगरसेवक उत्तम महाबळे व्यंकटराव घोडके,अकबर मौला यांच्यासह शिवप्रेमी उपोषणाला बसणार असल्याची माहिती यावेळी बोलताना सांगितले.व त्यानंतर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व छ. शिवाजी महाराज पुतळा समिती प्रमुख पुढे बोलताना म्हणाले की, लोहा शहरात १ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महारात यांचा पुतळा आणला होता,महाराजांचा पुतळा लोहा नगरपालिकेस भेट देणार होतो पण आचारसंहिता चे कारण दाखवत लोकवर्गणीतून आणलेला पुतळा पालिकेने खासदार यांच्या सांगण्यावरून पुतळा लोहा पालिकेने  जप्त केला.जे काम औरंगजेब ला जमले नाही ते काम नांदेड जिल्ह्याचे  खासदार यांनी केले आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे राजकारण पूर्वीपासूनच खासदार यांनी केले आहे.माजी खा.केशवराव धोंडगे यांच्या निधनामुळे आंदोलन थांबवले १९ फेब्रुवारी ला जर पुतळा बसला नाही तर माझ्यासहित तमाम शिवप्रेमी उपोषण करणार आहोत.मंदिर बनायगे मगर तारीख नही बतयेगे अशी रीत खासदार यांची आहे असा टोला शरद पवार यांनी खा प्रताप पाटील चिखलीकर यांना लगावला आहे.जेव्हा-जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा खा चिखलीकर यांनी खोडा घातला आहे.विशेष बाब म्हणजे आतापर्यंत छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची निविदा चार वेळेस काढून सुद्धा या निविदेची रक्कम भरली नाही ?असा सवाल सुद्धा शरद पवार यांनी उपस्थित केला. यावेळी पालिकेचे विरोधी पक्षनेते पंचशील कांबळे,माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार,माजी नगरसेवक पंकजसिह परिहार,माजी नगरसेवक उत्तम महाबळे,जेष्ठ गंगाधर महाबळे,व्यंकट घोडके,शिवराज पवार,विक्रांत नळगे, सत्तारभाई शेख,शिवाजी मुंडे यांच्यासह आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad