पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने गोरगरिबांच्या पोटावर पाय देऊन स्वस्त धान्याचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदाराच्या चौकशीसाठी कार्डधारकचे 26 रोजी आमरण उपोषण

 पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने गोरगरिबांच्या पोटावर पाय देऊन स्वस्त धान्याचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदाराच्या चौकशीसाठी कार्डधारकचे 26 रोजी आमरण उपोषण 




नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार 



तालुक्यातील देऊळगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार रमेश बंडेवार हे मनमानी कारभार करीत असून कार्ड धारकासोबत आडमूठ पणे वर्तुणूक करून  हाताच्या बोटाचे ठसे घेऊन ही पावती न देता चक्क गेल्या तीन वर्षांपासून मोफत चा येणारा माल व नियमित येणारा माल यात एक किलो कट्टी करून जादा दराने स्वस्त धान्य वाटप करीत आहे या संदर्भात कार्डधारकांनी विचारपूस केली असता आम्हाला तहसील कार्यालयाकडून माल कमी येत आहे तहसीलदार यांना दरमहा पाच हजार रुपये द्यावे लागतात असे सांगून तुम्हाला कुठे जायचे ते जा आमचे कोणीच काही करू शकत नाही असे बेताल पणे बोलून कार्डधारकाना धमकावत असून गोरगरीब कार्डधारकांना दर महा कमी माल देऊन स्वस्त धान्य काळ्या बाजारात विक्री करीत असून काही मर्जीच्या लोकांना गहू व तांदूळ पोते च्या पोते संध्याकाळी देत आहे जर तहसील कार्यालयाकडून स्वस्त धान्य कमी आले तर मग पोते च्या पोते   धान्य काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी  माल कुठून  आला हा मोठा चिंतनाचा विषय बनला आहे  पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने  गोरगरिबांच्या पोटावर पाय देऊन स्वस्त धान्य काळ्या बाजारात विक्री करून स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांची गुप्त पद्धतीने उच्च स्तरीय चौकशी करावी या मागणीसाठी कार्डधारक  26 जानेवारी रोजी तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा कार्डधारकांनी एका लेखी निवेदनाद्वारे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या कडे दिला आहे 


 कार्डधारकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की देऊळगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार रमेश पिराजी बंडेवार हे स्वस्त धान्य नियमित दरमहा वाटप करीत नाहीत आज तीन वर्षे झाली केंद्र सरकारने सुरू केलेल्या मोफत धान्य वाटपात घोळ करीत असून एक किलो धान्य कमी देत आहेत हाताच्या बोटाचे ठसे घेऊन ही पावती दिली जात नाही स्वस्त धान्य  तीन चार  रुपय घेऊन जादा दराने वाटप केले जात आहे काही कार्डधारकांचे  ठसे येत नाही म्हणून त्यांना माल दिल्या जात नाही  काही कार्डधारकांच्या  कुटूंबातील व्यक्ती कमी दाखवून त्यांचा माल  चक्क गायब केला जात आहे या संदर्भात काही कार्डधारकांनी विचारपूस केली तर आम्हाला तहसील कार्यालयाकडून माल कमी दिला जातो जादा दराने वाटप करून मिळणारे पैसे तहसीलदार यांना दर महा पाच हजार रुपये द्यावे लागतात असे म्हणून आपल्या धान्य चोरीवर पडदा टाकत तुम्हाला कुठे जायचे ते जा आमचे कोणी काही करू शकत नाही असे म्हणून कार्डधारकांना धमकावून अश्लील बोलून दुकानातून पिटाळून लावत आहे स्वस्त धान्य वाटप करताना कार्डधारकांच्या समोर धान्य वाटप न करता कार्डधारकांना बाहेर उभे करून आतून मोजून आणल्या जाते त्यात अर्धा किलो धान्य कमी येत असल्याची चर्चा दर महा गावभर होते पण दुकानदाराच्या दादागिरीला घाबरून कोणीच वाच्यता करण्यास पुढे येत नाहीत अशी स्वस्त धान्य दुकानदारांची दादागिरी आहे स्वस्त धान्य दुकानाला फलक नाही भाव फलक नाही तक्रार नोंद रजिस्टर नाही स्टाक रजिस्ट्र नाही असा मनमानी कारभार स्वस्त धान्य दुकांनदारचा असतांना  चोराच्या उलट्या बोबा असा प्रकार झाला आहे पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने गोरगरीब कार्डधारकांच्या पोटावर पाय देऊन स्वस्त धान्य काळया बाजारात विक्री करणाऱ्या दुकानदाराच्या कारभाराची उच्च स्तरीय चौकशी करावी यासाठी चक्क कार्डधारकांचे  26 जाणे रोजी लोहा तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा कार्डधारकांनी लेखी निवेदनाद्वारे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिला आहे 

 निवेदनावर रिपब्लिकन सेनेचे जिल्हा सचिव तथा कार्डधार रंगनाथ मोतीराम जोंधळे तालुका अध्यक्ष तथा कार्डधारक सखाराम पांडुरंग सोनवणे कार्डधाक रा देऊळगाव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad