बळीराजा शेतकरी संघटनेच्या विविध पदाधिकार्यांच्या निवडी संपन्न!
सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्याच्या विविध निवडी पार पडल्या
बळीराजा शेतकरी संघटनेची सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील बार्शी व परंडा येथे बैठक झाली. यामध्ये विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी बळीराजा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील व प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आल्या.
यावेळी पंजाबराव पाटील बोलताना म्हणाले की,राज्यात गोरगरीब शेतकऱ्यांची विज बील,पाणी,ऊस दरात, उत्पादक खर्च सुध्दा न मिळने, बाजार समितीत पिकाला भाव न मिळने अशा विविध माध्यामातून पिळवणूक होत आहे. ते कुठे तरी थांबवण्यासाठी व शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठीच ह्या बळीराजा संघटनेची स्थापना केली असून सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील निवडी केल्या शेतकऱ्यांच्या आडचणी ते सहभागी होतील त्यांना न्याय देतील अशीच आशा बाळगतो.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर माऊली जवळेकर,सोलापूर जिल्हा सरचिटणीस श्री. संतोष बोरा, सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री. उत्तम खबाले, राजाभाऊ जाधव,जयंत पाटील, नागनाथ पाटील तसेच नुतन पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नुतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी याप्रमाणे : श्री. लक्ष्मण पाटील, कापसी : बार्शी तालुकाध्यक्ष,
श्री.सचिन आगलावे (बावी)
तालुका उपाध्यक्ष,
श्री.सुधीर बारंगुळे, (खांडवी)
तालुका उपाध्यक्ष,
श्री.दयानंद चौधरी, (शिराळे)
तालुका सचिव,
श्री.ऑड. सुकुमार खामगांवकर,(उपळाई ठो.)
तालुकाध्यक्ष लिगल सेल,
श्री. हनुमंत भुईटे (सावरगांव )
तालुकासंपर्कप्रमुख
श्री. सागर शिंदे, (कुसळंब)
तालुका कार्याध्यक्ष
श्री. महेश गोरे, (धानोरे )
तालुका सरचिटणीस
श्री. दिलीप गव्हाणे,( बार्शी)
: तालुका संघटक
श्री. सोमनाथ बारंगुळे, (खांडवी)
तालुकासदस्य तसेच
उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्यकारिणीची निवड याप्रमाणे :
फारुख शेख : उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष श्री. विजय मेहेर : परंडा तालुकाध्यक्ष श्री. अमित आगरकर : परंडा तालुकाध्यक्ष युवा आघाडी
श्री. धनंजय गोफणे : परंडा तालुका उपाध्यक्ष
आदी मान्यवर उपस्थित होते.