फिर्याद देण्यासाठी गेलेल्या लोकांना लाँकअप मध्ये कोंडुन अमानुष मारहाण;
आमदार गोपीचंद पडळकर यांना देखील शिवीगाळ
आष्टी पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी नागवेचे रझाकारी कृत्य
जालना जिल्ह्यातील कोकाटे हादगाव ता.परतुर येथे शेतीच्या वादातून धनगर समाजाच्या लोकांच्या गावातील समाजकंटकाकडून सामुदायिक हल्ला करण्यात आला यात अनेक लोक जखमी झाले याची तक्रार देण्यासाठी आष्टी पोलिस चौकीला गेले असता त्यांचेवर खोटे गुन्हा दाखल करुन लाँक अप मध्ये कोंडून API शिवाजी नागवे यांनी अमानुषपणे मारहाण केली आहे.या मारहाणीची काँल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असुन त्यात पोलीस अमानुष पणे मारहाण करतांना ऐकू येत आहेत तसेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचेबद्दल पोलीस अश्लील भाषेत शिवीगाळ करीत आहेत.सदरील घटना 28 /11/2022 रोजी आष्टी पोलिस चौकी येथे घडलेली आहे.यावेळी बीट जमादार बहिरवार यानेही कोकाटे हादगाव येथील 7 नागरिकांना मारहाण केली
फिर्याद देण्यासाठी गेलेल्या लोकांवर भांदवी 324,323,504,148 प्रमाणे खोटे गुन्हे दाखल करुन न्यायालयासमोर हजर न करताच दोन दिवस पोलीस स्टेशनला डांबून ठेवून मारहाण केली.आष्टी पोलिसांकडुन अधिकाराचा दुरुपयोग करण्यात आला असुन अंगावर असलेल्या खाकीचा जातीसाठी वापर करणाऱ्या व जातीयवादी भूमिका घेवून गोरगरिबांना मारणा-या नागवेचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.
पैठण तालुका प्रतिनिधी आप्पासाहेब भावले.