*नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी लोक उपयोगी कामे करावेत -- बालाजी बच्चेवार भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र यांचे प्रतिपादन*
नायगांव ता.प्र .
(परमेश्वर पा.जाधव)
नव्याने जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न झालेले आहेत विविध गटाचे व पक्षाची लोक सरपंच सदस्य म्हणून निवडून आले आहेत आता निवडणुका पार पडल्या आहेत निवडणूक झाल्यानंतर सरपंच व सदस्य हा संपूर्ण गावचा असतो याची जाणीव निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी ठेवणे आवश्यक आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून गोरगरीब व गरजू लोकांची प्राधान्याने सेवा करण्याची जबाबदारी नवनियुक्त सरपंचाची आहे ग्रामपंचायत च्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची जबाबदारी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे आहे गावातील रस्ते पिण्याचे पाणी आरोग्याची व्यवस्था ड्रेनेज व्यवस्था स्वच्छता या गोष्टीकडे प्राधान्य नवनियुक्त लोकप्रतिनिधीमुळे लक्ष देऊन गावचा विकास करून घेणे अपेक्षित आहे येणाऱ्या काळात आपणच आपल्या भागाचं प्रतिनिधित्व करणार आहात याची जाणीव ठेवून काम करावे असेही पुढे बोलताना भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना संदेश दिला