महासभेचे दुसरे अधिवेशन १६ व १७ फेब्रुवारीला तिरुपती येथे भरविण्यात येणार
ना. सुधीरभाऊ मुनगुंटीवार यांची प्रमुख उपस्थिती
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार*
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे दुसरे अधिवेशन श्रीक्षेत्र तिरुपती येथे दिनांक १६ व १७ फेब्रुवारी २०२३ रोजी भरविण्यात येणार आहे.
दिनांक १६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी मंत्री मदन येरावार, आमदार समीर कुन्नावार, राज्य सभेचे माजी खासदार टि.जी.व्यंकटेश, काशी अन्नसञमचे गुब्बा चंद्रशेखर, विलास बच्चू यांच्यासह महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत महासभेचे दुसरे अधिवेशन तिरुपती येथे भरविण्यात येणार आहे.
दिनांक १७ फेब्रुवारी रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने तिरुपती येथे बांधण्यात येणाऱ्या नियोजित महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा "भक्त निवास" चा भूमिपूजनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तिरुपती येथे भरविण्यात येणाऱ्या महासभेच्या दुसऱ्या अधिवेशना संदर्भात महासभेच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी रात्री मीटिंग घेण्यात आली. या मीटिंगमध्ये तिरुपती येथे भरविण्यात येणाऱ्या महासभेच्या दुसऱ्या अधिवेशनाच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे वेदांत केसरी ब्रह्मीभूत परमपूज्य रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या पुण्यतिथी दिनीच महासभेला ८० जी प्रमाणपत्र मिळाले आहे. ह्या प्रमाणपत्रामुळे करदात्याला सवलत मिळणार असून महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, महासचिव गोविंदराव बिडवई, कोषाध्यक्ष सुभाषराव कन्नावार, बांधकाम समितीचे अध्यक्ष भानुदास वट्टमवार यांच्या मार्गदर्शनाखाली महासभेचे सीए राहुल जिल्हेवार यांनी अथक परिश्रम घेऊन सदरील प्रमाणपत्र मिळविले आहे.
त्याबद्दल राहुल जिल्हेवार यांचा अभिनंदनचा ठरावही घेण्यात आला. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने नांदेड येथे वासवी भवन बांधण्यात आले. त्यानंतर आता तिरुपती येथे महासभेचे भक्त निवास बांधण्यात येणार आहे.
दिनांक १६ व १७ फेब्रुवारी २०२३ रोजी तिरुपती येथे होणारे अधिवेशन आणि भूमिपूजन कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश तेलंगाना व इतर राज्यातील आर्य वैश्य समाजातील समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनाच्या नियोजनासाठी महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, महासचिव गोविंदराव बिडवई, कोषाध्यक्ष सुभाषराव कन्नावार, बांधकाम समितीचे अध्यक्ष भानुदास वट्टमवार, संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार, राज्य प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र येरावार यांच्यासह महासभेचे राज्य, जिल्हा व तालुका कार्यकारणीतील पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.
अधिवेशनास महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.