खाटीक समाजाच्या मागण्या हिवाळी अधिवेशनात मांडणार -आमदार श्री राजुभाऊ पारवे
खाटीक समाज परिवर्तन संघटनेच्या शिस्टमंडळाने भेटून दिले निवेदन
संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास एक करोड पंचवीस लाख खाटीक समाज असून त्यांचा वंशपरंपरागत व्यवसाय हा बकऱ्याचे मांस विक्री करणे हा आहे.खाटीक समाजाची आर्थिक व सामाजिक स्थिती ही अत्यंत दयनीय असून ऐंशी टक्के समाज दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत आहे. अनुसूचित जाती मधील ही जात वगळता ईतर जातीच्या उत्थानाकरिता शासनाने वेळोवेळी विविध महामंडळाची स्थापना करून तसेच विविध योजना राबवून त्या त्या जातीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत.परंतु स्वातंत्र्याची 75 वर्ष उलटूनही आजतागायत खाटीक जातीसाठी कोणत्याही योजना किंवा महामंडळ स्थापन केलेले नाही ही शोकांतिका आहे.अलीकडे मटण खाणाऱ्यांचे प्रमाणात वाढ झाली तरी तसेच,बकरा व मेंढीच्या मांसाला अन्न घटकांचा दर्जा प्राप्त झाला तरी सुद्धा आजही या समाजाला आपला व्यवसाय हा गाव कुसाबाहेर करण्यास बाध्य केले जाते
समाजाच्या या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मा.आमदार श्री राजुभाऊ पारवे उमरेड मतदारसंघ यांनी या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडला होता परंतु त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही
त्यामुळे पुन्हा हिवाळी अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी खाटीक समाज परिवर्तन संघटनेच्या शिस्टमंडळाने मा.आ.श्री राजुभाऊ पारवे यांची उमरेड येथे जाऊन भेट घेतली व आपल्या मागण्यांचे निवेदन दिले निवेदनामधे खालील मागण्यांचा समावेश आहे.
१)डॉ संतुजी लाड आर्थिक विकास महामंळाची स्थापना करणे
२)डॉ आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेवर अशासकीय सदस्य म्हणुन खाटीक समाजाच्या प्रतिनिधीची नियुक्ति करणे
३)चर्मकार समाजाच्या धर्तीवर मटन विक्रेत्यांना टिन पत्र्याचे खोके देणे
४)सर्व अनुसूचीत जातीच्या समाजाला न्याय मिळण्यासाठी अ ब क ड श्रेणी निर्माण करणे
५)स्वताच्या जागेमधे मटन व्यवसाय करणार्याला परवाणगी मिळणे
६)मटन विक्रेत्यांना बँकेच्या कर्जाची तरतुद करणे
७)बकर्याची वाहतुक करणाणार्या खाटीक समाजाला वाहतुकीचे नियम शिथिल करणे
८)नगरपालिका व महानगर पालिका क्षेत्रात झोन निहाय मटन मार्केट बनविणे
या वेळी शिस्टमंडळामध्ये नंदकिशोर हरणे,डॉ विठ्ठलराव कठाळे,मोहन नेहर,रामेश्वर माहुरकर,प्रमोद हरणे,डॉ श्रीकृष्ण कंटाळे,माणिकराव नेहर,सतिश माहुरे,उमेश डोईफोडे,संतोष माकोडे,सुरेश माहुरे,सुनील कठाळे,प्रवीण पारडे,संजय कुर्हेकर,सुधाकर कंटाळे इत्यादी उपस्थित होते.