*आरमोरी तालुक्यातील सट्टा पट्टी व अवैध दारू विक्री तत्काळ बंद करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी*
आरमोरी :- आरमोरी शहर गडचिरोली जिल्ह्यात धार्मिक व शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेले शहर आहे मात्र काही वर्षापासून आरमोरी तालुक्यात व शहरात खूप मोठ्या प्रमाणात अवैध सट्टा पट्टी व दारू विक्रीचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे समाजात खूप मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनता वाढतांना दिसत आहे विषारी दारूमुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमावा लागत आहे विद्यार्थी वर्ग व्यसनांच्या आहारी जाऊन वांग मार्गाला लागताना दिसत आहेत त्यामुळे आरमोरी तालुक्यातील सट्टा पट्टी व दारू माफीयांचे अवैध धंदे तत्काळ बंद करण्यात यावे यासाठी दिनांक १४ ऑक्टोबर२०२२ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आरमोरी तर्फे आरमोरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार मा. मनोजजी काळबांडे साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मा.रंजीतभाऊ बनकर , मनसे महिला आघाडी आरमोरी तालुका अध्यक्ष मा. विभाताई बोभाटे , तालुका उपाध्यक्ष मा. ज्योतीताई बघमारे , शहराध्यक्ष मा. उमा कोडापे ,मनसे आरमोरी तालुकाध्यक्ष मा.राकेशभाऊ सोनकुसरे , किशोर जंजाळकर, आशुतोष गिरडकर, महानंदाताई शेंडे, आशाताई बोळणे उपस्थित होते