रांझणीत आ. समाधान आवताडे तसेच आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखानाच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन...

 रांझणीत आ. समाधान आवताडे व आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखानाच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन...




रांझणी ता. पंढरपूर येथे उभा राहणार सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखानाच्या नवीन  इमारत बांधकामाचे भूमिपूजन  मा.श्री.आमदार समाधान आवताडे  आणि आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.



  पंढरपूर तालुक्यातील  रांझणी येथे सोलापूर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत पशुवैद्यकीय सेवासुविधा युक्त  पशुवैद्यकीय दवाखाना उभा राहत असून पुढील काही महिन्यात सुसज्ज  , वैद्यकीय सोयीसुविधा असणारी इमारत उभी राहील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. 


    या पशुवैद्यकीय दवाखान्यातर्गत विविध सेवा देण्यात येणार आहेत. यामध्ये प्राण्यांची आरोग्य तपासणी, विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, विविध नमुने तपासणी, औषधोपचार, वंध्यत्व तपासणी, शत्रक्रिया, गर्भ तपासणी,  लसीकरण आदी सेवा उपलब्ध असणार आहेत.  



 रांझणी परिसरात पशुधन आणि पशुपालकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे याठिकाणी सुसज्ज पशू दवाखान्याची गरज व्यक्त केली जात होती. या दवाखान्यामुळे पशूधनाच्या आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे.

यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख, हरीश दादा गायकवाड,सरपंच दादासाहेब ढोले, संतोष घोडके,दादा घायाळ, चे.किसन भूताडे,

ग्रा.प.स.अकबर मुलानी,ग्रा.प.स.दीपक पंडित, 

मारुती भाकरे,धनाजी पवार,दादा घायाळ धनाजी पवार,अभिजित माने,नानासाहेब लक्ष्मण घाडगे,माहादेव सप्ताळ,ढीगंबर मोरे,अशोक घोडके,शहाजी घोडके,संदीप गांडुळे,अशोक दांडगे आदी मान्यवर उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.