पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोबाईल चोरी करणा-या चोरांविरुध्द धडक कारवाई आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडुन ३,८९,०००/- रूपये किंमतीचे एकुण ५० मोबाईल केले जप्त"

 "पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोबाईल चोरी करणा-या चोरांविरुध्द धडक कारवाई आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडुन ३,८९,०००/- रूपये किंमतीचे एकुण ५० मोबाईल केले जप्त"



गुन्हयामध्ये एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल व ९८८१३८१७१९ हे सिमकार्ड चोरीस गेलेबाबत तक्रार प्राप्त झालेने मा. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधिक्षक श्री हिमंतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग श्री. विक्रम कदम व श्री. अरुण पवार, पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे युक्रेन्दुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सपोनि सी. व्ही केंद्रे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास सुरू केला. सायबर शाखा सोलापुर ग्रामीण यांचेकडुन तांत्रिक तपासाचे आधारे प्राप्त माहीतीनुसार चोरीस गेलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल हँडसेटमध्ये एक इसम हा त्याचे नावे असलेले जिओ कंपनीचे सिमकार्ड टाकुन वापरत असल्याची माहिती प्राप्त झाली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी मौजे वाढेगाव ता. सांगोला या ठिकाणी जावुन इसम नामे सिताराम दामोदर जाधव याचेकडे चौकशी केली असता, त्याने हा चोरीस गेलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल ०१ महिन्यापुर्वी एका इसमाकडुन विकत घेतला असलेचे सांगीतलेने नमुद साक्षीदार या पोरीस गेलेला मोबाईल सेट जप्त केला. व त्यानंतर मौजे पारे ता. सांगोला या ठिकाणी जावुन आरोपी इसम यास तपासकामी ताब्यात घेवुन गुन्हयाचे अनुशंगाने साक्षीदार व आरोपीस समोरासमोर घेवुन तपास केला असता आरोपी इसम हा मोबाईल चोरीतील सराईत गुन्हेगार असलेचे निष्पन्न झालेने त्यास तपासकामी अटक करून सदर गुन्हयाचा पुढील तपास केला असता सदर आरोपीतांकडुन


वेगवेगळया कंपनीचे एकुण ३,८९,०००/- रू किंमतीचे ५० मोबाईल हस्तगत करून ते गुन्हयाचे तपासकामी जप्त करणेत आलेले आहेत.


सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. हिमंतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग श्री. विक्रम कदम, व श्री. अरुण पवार, पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि सी. व्ही केंद्रे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय आसबे, सपोफौ राजेश गोसावी, पोहेकॉ सुरज हेंबाडे, शरद कदम, बिपीन ढेरे, पोलीस नाईक सचिन इंगळे, सुनिल बनसोडे, दादा माने, राकेश लोहार, शोएब पठाण, सचिन हेंबाडे, सुजित जाधव, पोका समाधान माने तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीण चे पोका अन्वर आतार यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad