आज भिम आर्मीचे भाई सिंध्दात वानखेडे यांच्या नेतृत्वतील चिखली तहसिलवरील धरणे व मुंडण आंदोलन यशस्वी*

                                                        

  *आज भिम आर्मीचे भाई सिंध्दात वानखेडे यांच्या नेतृत्वतील चिखली तहसिलवरील धरणे व मुंडण आंदोलन यशस्वी*



  चिखली:-  तहसिल कार्यालया समोर भिम आर्मी (भारत एकता मिशन) च्या वतीने धरणे व मुंडने आंदोलने यशस्वी रित्या पार पडले. सदर आंदोलन हे मेहकर तालुक्यातील मोळा -मोळी या गावामध्ये बैल पोळयाच्या दिवसी बौध्द मागासवर्गीय वृध्द व्यक्तीने तोरणा खालुन बैल नेला म्हणुन बौध्द वृध्दा सह त्यांच्या कुंटुंबीयांना व महीलांना बेदम मारहाण करण्यात आली तसेच चिखली तालुक्यातील धानोरी गावामध्ये शाळेतील जातीवादी शिक्षकांने मागासवर्गीय अल्पवयीन मुलीवर लौगिंक अत्याचार केला व राजस्थान मध्ये इंद्रकुमार मेघवाल या 9 वर्षीय अल्पवीयन मुलाने शाळेतील पाण्याच्या माठातील पाणी पिल्यामुळे सदर शिक्षकाने त्याला जिव - जाई पर्यंत मारले. 



 असे विविध विषय घेवुन चिखली तहसील समोर भिम आर्मी च्या वतीने धरणे व मुंडण आंदोलन करण्यात आले.*तसेच या आंदोलनाचेे नेतृत्व भिम आर्मी जिल्हाअध्यक्ष भाई सिंध्दात वानखेडे यांन्नी मुंडण करुन केले* व या सर्व प्रकरणातील आरोपींना अॅट्रासिटी अंतर्गत व बाल लौगिंक अत्याचार गुन्ह्या अंतर्गत गुन्हा नोदवुन या आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे असे प्रतिपादन जिल्हाअध्यक्ष भाई सिंध्दात वानखेडे यांनी आंदोलन स्थळी आपल्या वक्तव्यामध्ये केले. तसेच या आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा दर्शविला त्यामध्ये लहुजी शक्ती सेनेचे कैलास भाऊ खंडारे ,डेमोक्रेटीड पार्टी चे विदर्भ अ. भाई छोटु कांबळे ,पँथर रि. पा. जि. अ. युवा आघाडी चे सतिष राजे पौठणे तसेच स्वाभिमानी रि. पार्टी चे जि.अ. भाई सिध्दार्थ पैठणे ,गायक देवानद वानखेडे इत्यादींनी आजच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. 


 तसेच हे आंदोलन करते वेळी संघमित्राताई कस्तुरे (सामाजिक कार्यकर्ते), अशोक लहाने (जि.कोषाध्यक्ष भिम आर्मी), जि.कार्याध्यक्ष जितेंद्र खांडेराव ,अक्षय अवसरे ,गजानन बांगर , संदीप खिल्लारे , प्रविण खिल्लारे ,विशाल आव्हाड, सागर सहाणे, राहुल गवई ,निबांजी घेवंदे, अमोल भंडारे ,पंढरी दशरथ इत्यादींच्या सहया आंदोलन निवेदना वरती असुन सदर आंदोलनाचे निवेदन हे तहसिलदार साहेब चिखली यांना देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad