महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास यश आले असून पंढरपूर- सोलापूर (ओझेवाडी, दामाजी कारखाना मार्गे) नवीन एस.टी. बस सुरू...
रांझणी/प्रतिनिधी
"पंढरपूर तालुक्यातील पूर्व भागातील गोपाळपूर, कोंढारकी, मुंढेवाडी, चळे, रांझणी, आंबे, सरकोली, नेपतगाव, ओझेवाडी, मुढवी या गावातील नागरिकांची कित्येक दिवसाची अडचण झाली दूर..." कोणत्याही कामानिमित्त सोलापूरला जावयाचे असल्यास पंढरपुरला येऊन परत सोलापूरला जावे लागायचे. यामुळे ग्रामस्थांना किमान ३०-४० किलोमीटर प्रवास जास्त करावा लागत असे. तसेच यासाठी साधारणत: ३०-४० रुपये लागत असत. परतीच्या प्रवासात देखील हाच फेरा होता. नागरीकांची ही गैरसोय लक्षात घेऊन सातत्याने पाठपुरावा केला.....
त्याच प्रयत्नांना यश येत आजपासून पंढरपूर- सोलापूर (ओझेवाडी, दामाजी कारखाना मार्गे) नवीन एस. टी. बस सुरू करण्यात आली आहे. नवीन एसटी स्टँड, ओझेवाडी पंढरपूर येथून ही एसटी बस सुरू झालेली आहे. ही बस सुरू झाल्याने लोकांची मोठ्या प्रमाणावर सोय होणार आहे. रोजच्या प्रवासात येणाऱ्या अडचणी ही बस सुरू झाल्याने कमी होणार आहेत. वेळेची तसेच पैशांची देखील बचत यामुळे होऊ शकणार आहे.
या शुभारंभ कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. गणेश मधुकर पवार, सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंढरपूर, मा.श्री.सुधीर संदीपान सुतार,आगार व्यवस्थापक,वरिष्ठ रा.पं.पंढरपूर, मा.श्री.रत्नाकर लाड साहेब,सहाय्यक वाहतुक अधिक्षक, भालचंद्र थोरात साहेब,सहाय्यक वाहतूक निरीक्षक विभागीय, विष्णू शिंदे सर, घाडगे सर, विट्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ (दादा) भालके, शिवाजी दांडगे सर,किसन भुताडे ,गणेश घाडगे,सिताराम मोरे ,गजानन पाठक,दादा ढोले, उपसरपंच मारुती भाकरे, दिपक पंडीत,खंडू पवार, कैलास शिंदे, शहाजी घोडके आणि ग्रामस्थ रांझणी, पापा मुलाणी,विलास डुबल, पांडूरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक सिताराम भाऊ नागणे, शहाजी बापू नागणे, तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष शिवाजी गायकवाड, माजी सरपंच राजाराम गायकवाड, खरेदी विक्री संघाचे संचालक अनिल वाघमोडे,सोसायटी चे माजी चेअरमन विठ्ठल गायकवाड, बापूसाहेब नागणे,मारुती गायकवाड,रामचंद्र गायकवाड,मच्छिंद्र मोटे मामा मोहन गायकवाड,लक्ष्मण गायकवाड,काशिनाथ नागणे,शहाजी नामदे,विष्णू गायकवाड, वामन गायकवाड,केराप्पा माने,लहू गायकवाड, शंकर नामदे,संतोष क्षिरसागर,जीवन गायकवाड,भारत गायकवाड,आण्णा सातपुते, सावकार गायकवाड,शफीक मुलाणी सर,विश्वास नागणे सर, श्री नितीन मोरे ,पटू गायकवाड सर, मिसाळ सर, गायकवाड आर टी सर, आबा खिलारे सर, डॉक्टर रामदास घाडगे, बंडू मोरे, इंडप्पा कोळी, समाधान गायकवाड, प्रमोद गायकवाड सर, सुतार सर, बालाजी फुगारे सर, निर्मळ सर,
समाधान घाडगे सर, विजय घाडगे सर, ओझेवाडी केंद्राचे केंद्र प्रमुख नवनाथ मोरे गुरुजी,सुदाम मोरे संचालक पांडुरंग कारखाना, सिध्देशवर मोरे मा.सरपंच, भारत मोरे, अभिमान मोरे, धर्मा नवले, अशोक घाडगे, महादेव पाटील, आण्णा मोरे, रविंद मोरे, प्रमोद मोरे, मधुकर मोरे, हणमंत मोरे, चंद्रकात मोरे, माधव मोरे, पुंडलिक मोरे, संजय मोरे, अनिल शिंदे, सुहास मोरे, आनंद मोरे व इतर मुंढेवाडी ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.