गणेश जाधव या तरुणांने केला वाढदिवसानिमित्त देहदानाचा संकल्प..समाजा पुढे एक नवा आदर्श..

 *गणेश जाधव या तरुणांने केला  वाढदिवसानिमित्त देहदानाचा संकल्प..समाजा पुढे एक नवा आदर्श..*



*प्रतिनिधी,औरंगाबाद :* जिल्ह्यातील दिवशी पिपळगाव येथील 23 वर्षीय गणेश जाधव या तरुणाने आपल्या वाढदिवसानिमित्त देहदानाचा संकल्प करून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला. गणेश जाधव यांचा वाढदिवस 23 जुलै यादिवशी आहे.वाढदिवसानिमित्त त्यांनी हा संकल्प केला आहे. ते सध्या सामाजिक कार्य या क्षेत्रातून पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. मरणोत्तर अवयवदानामुळे अन्य कोणीतरी हे सुंदर जग पाहू शकेल यासाठी वाढदिवसा निमित्त देहदानाचा संकल्प करून त्यांनी एमजीएम येथील शरीररचनाशास्त्र विभागाकडे सहमती पत्र सुपूर्त  करून समाजासमोर आदर्श उभा केला.त्यांच्या या निर्णयाचे आणि त्यांना देहदानासाठी संमती देणारे त्यांचे वडील साहेबराव जाधव आई मुक्ताबाई जाधव , काका सुभाष जाधव , काकु ताराबाई जाधव यांचे समाजा कडून कौतुक केलं जात आहे. गणेश जाधव ज्या भागात वास्तव्य करतात त्या भागात देहदान करण्याचा संकल्प करणारे हे पहिले व्यक्ती आहेत. त्यांच्या या निर्णयाने समाजात एक आदर्श उभा राहिला आहे.

https://amzn.to/3b3qCPd

*प्रतिक्रिया*

गणेश जाधव : 'मरावे परि कीर्तीरुपी उरावे' अशी मराठीत एक म्हण आहे. जिवंतपणी माणूस समाजाच्या कामी येत असतोच; पण मृत्यूनंतरही तो उपयोगी पडू शकतो, हे आधुनिक विज्ञानाने सिद्ध केले आहे. योग्य प्रमाणात अवयवदान होत नसल्याने आजही कित्येक जण हे विविध अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. मृतदेह जाळून नदी किंवा तलावात रक्षा विसर्जन करण्यात येते. यामुळे जलप्रदूषण होते. ते टाळण्यासाठी देहदान उत्तम पर्याय आहे.

आपल्या पश्‍चात दुसऱ्याच्या आयुष्याला नवसंजीवनी देण्याची किमया देहदानात आहे, ही बाब केवळ एकून न घेता ती अंमलात आणण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असून मी हा संकल्प करत आहो अस गणेश जाधव यांनी सांगितले..


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad