विठ्ठलच्या कथित मालकांनी आतातरी सुधरावे* *विठ्ठल प्रत्येक सभासद शेतकऱ्याच्या मालकीचा आहे;*

 ,*विठ्ठलच्या कथित मालकांनी आतातरी सुधरावे*


*विठ्ठल प्रत्येक सभासद शेतकऱ्याच्या मालकीचा आहे;*




 *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 



विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर होताच विठ्ठल कारखान्यासंदर्भात मनात नसतानाही विद्यमान चेअरमन आणि सत्ताधाऱ्यांना नाईलाजाने बैठक घ्यावी लागली.आजवर सभासदांपासून फारकत घेतलेले अन कायम मोबाईल बंद ठेऊन भूमिगत झालेले चेअरमन भगीरथ भालके साहेब अचानक प्रकट झाले.निमित्त होते अभिजित पाटील यांच्या विचार विनिमय बैठकांना मिळणारा हजारो सभासदांचा प्रतिसाद आणि पाठिंबा.यावर आपल्या वडिलांच्या पुण्याईने आपल्याला मिळालेला आपला एक कारखाना नीट चालवू न शकलेल्या नेत्याचे म्हणणे आहे की *तुमच्या सभांना गर्दी झाली म्हणून काय झालं नुसत्या गर्दीने तुम्हाला मते मिळणार नाहीत.सभासद आमच्याच पाठीशी आहेत* हे म्हणजे असं झालं *चोराच्या उलट्या बोंबा* हजारो शेतकऱ्यांचे,कामगारांचे कोट्यवधी रुपये थकवून त्यांच्या चुली बंद पाडून कोणत्या अधिकाराने तुम्ही मत मागत आहात?तुम्हाला हा अधिकार दिला कुणी?



   आजवर अनेक वेळा कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यायचे ठरले होते. पण प्रत्येक दिवशी वेग वेगळी कारणे देत केवळ ऑनलाईन सभा घेत सभा गुंडाळून टाकण्यात आली.सभासद शेतकऱ्यांचे ऊसतोडणी वाहतूकदारांचे कोट्यवधी रुपयांची देणे बाकी असतानाही त्यांना साधी समाधानकारक उत्तरेही देण्यात आली नाहीत.अगदी दुर्लक्षित घटक असल्यासारखे त्यांना सरळ सरळ डावलले गेले.विठ्ठलच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या प्रदीर्घ कालावधीपर्यंत चेअरमन व सभासद शेतकऱ्यांची सामोरा समोर भेट झाली नाही.त्यामुळे सगळेच सभासद समोर भेट कधी होईल याची वाट पाहत होते.बैठक सुरू झाली आणि व्हायचा तो राडा झालाच.एका सभासद शेतकऱ्याने आपले उसाचे बिल मिळावे यासाठी विचारणा केली आणि वाद सूरू झाला.मुळात वादाचे कारण काहीच नव्हते.त्या शेतकऱ्याच्या नावावर तुम्ही १८ लाख रुपयांचे परस्पर कर्ज काढल्याचाही त्याचा आरोप होता.यासाठी आपली रास्त तक्रार करता यावी यासाठी तो माईक मिळावा अशी मागणी करत होता पण एका कारखान्याच्या विद्यमान चेअरमन असलेल्या नेत्याने त्या शेतकऱ्याला आपल्या हातातील माईक न देता बाजूला ढकलून अपशब्द वापरले.हा केवळ त्या एका शेतकऱ्याचा अपमान झाला नाही तर उसबील थकीत असलेल्या आणि आपल्या हक्कासाठी भांडणाऱ्या प्रत्येक सभासद शेतकऱ्याचा अपमान आहे.यावर चेअरमन साहेब व सत्ताधारी गटाने समाधान कारक उत्तर देणे अपेक्षित होते.पण प्रतिप्रश्न केला म्हणून सत्ताधारी गटाच्या काही प्रमुख लोकांनीच व कथित पुढाऱ्यांनी त्या शेतकऱ्याला शिविगाळ करत मारहाण केली. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी हा सर्व प्रकार बघत असून प्रकरण जास्त चिघळत जाईल या भीतीने पुन्हा त्यांनी त्या शेतकऱ्याला पुन्हा समोर आणून बोलायला माईक दिला.तो शेतकरी अगदी सौम्य भाषेत आपली व्यथा मांडत होता पण नेहमीप्रमाणे सत्ताधाऱ्यांकडे उत्तर नव्हते.चेअरमन साहेबांनी त्या शेतकऱ्याच्या प्रश्नाचे समाधान कारक उत्तर देणे अपेक्षित होते.पण काम न करता पुन्हा पुन्हा विषय चघळत बसण्यात माहीर असणाऱ्या लोकांनी चर्चा चालू केली. *"तो सभासद शेतकरी अभिजित पाटील यांनी मुद्दाम आमच्या सभेत पाठवला होता.जशास तसे उत्तर दिले जाईल अमुक तमुक ..."* साहेब हे उत्तर तुम्हाला शोभनिय नाही.तुम्ही चेअरमन म्हणून कारखान्याचे प्रमुख आहात आणि लोकांची देणी देण्यासाठी तुम्ही बांधील आहात.पण नेहमीप्रमाणे तुम्ही विषयाला बगल देऊन तुमची बाजू झटकून शेतकऱ्यावर आरोप करून मोकळे झालात.तुमच्याकडे गेल्या कित्येक महिन्यांपासून थकलेली ऊस बिले,आपले थकलेले पगार मागण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला अमुक व्यक्तीचा कार्यकता तमुक व्यक्तीचा माणूस म्हणून तुम्ही किती दिवस हाकलत राहणार?साहेब सभासद शेतकरी तुमच्याकडे पैसे मागायला येतोय ते त्याच्या हक्काचे पैसे आहेत.तुम्ही त्याला भिकाऱ्यासारखी वागणूक देऊन हिणवू नका.




अगोदर तुमच्याकडे लाखो रुपये थकल्याने शेतकऱ्यांची अवस्था नाजूक बनली आहे.कित्येकांच्या मुला मुलींची लग्ने खोळंबली आहेत.कारखाना आणि सभासदांच्या नावे कोट्यवधी रुपयांची कर्जे काढून तो पैसा तुम्ही कोणत्या निवडणूकीत वापरला आणि कुणाच्या जीवावर निवडणूक लढवलीत हे वेगळे सांगायला नको.तुम्ही दररोज खऱ्या मालकाला(सभासद शेतकऱ्याला) लथाडत असल्याने त्यांना तुमच्या विरोधात पर्याय शोधवाच लागेल.नाहीतर तुमची मग्रुरी पुन्हा वाढत जाईल.त्यामुळेच ते अभिजित पाटलांकडे नवी आशा म्हणून पाहत आहेत.तुम्हाला प्रतिप्रश्न करणाऱ्या शेतकऱ्याचे अभिजित पाटलांसोबत एक दोन फोटो पाहून तुम्ही त्याच्यावर अमुक व्यक्तीचा कार्यकर्ता म्हणून शिक्का मारू नका.जीव लावणाऱ्या आणि काम करणाऱ्या माणसाजवळच शेतकरी जात असतो.कारण कधी काळी या शेतकऱ्यांनी तुमच्यासाठीही खूप कष्ट सोसले आहेत आणि तुमच्या सोबत फोटोही काढले आहेत.आणि मुळात शेतकरी हा कुणाचाच कार्यकर्ता नसतो.तो मालक असतो आणि कायम मालकच राहतो.पण आपल्या पदाला मालकी समजून तुम्ही सर्वच सभासदांना कार्यकर्ते आणि कामगार समजत आहात.त्यांच्याच पैशांवर आजवर ऐश करून त्यांना भिकारी म्हणून हिणवत आहात.साहेब वेळ खूप ताकदवान असते आणि ती प्रत्येकाला आपली लायकी दाखवतेच..आज ज्या शेतकऱ्यांना तुम्ही हिणवत आहात तेच शेतकरी उद्याच्या निवडणूकीत तुमचा मालक पणाचा रुबाबही उतरवुन टाकतील ह्यात आश्चर्य वाटायला नको..आणि राहिला प्रश्न अभिजित पाटलांचा तर त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे.चार-चार कारखाने केवळ पाच सहा वर्षाच्या अनुभवावर सर्वात यशस्वीपणे चालवून दाखवत त्यांनी तुम्ही केलेला  *कारखानदारी खूप अवघड आहे* हा बाऊ फोल ठरवला आहे.मग सभासद त्यांना झुकते माप देणारच..त्यामुळे चेअरमन साहेब केवळ अफवा गैरसमज पसरवण्याचे काम बंद करून काहीतरी काम करून तुम्हीही तुमचं कर्तृत्व सिद्ध करा म्हणजे सभासद तुम्हालाही पाठिंबा देतील. तूर्तास गोरगरीब शेतकऱ्यांच्या बिलांचं तेवढं बघा अन्यथा निवडणूक लढवण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही..आणि तरीही तुम्ही धाडस केलं तरी सभासद तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहीत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad