बळीराजा शेतकरी संघटनेत गटबाजी करणाऱ्या व बंडखोर कार्यकर्त्याच्या वर कारवाई करण्याचा सर्वानुमते निर्णय घेऊन संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली.
पंढरपूर-बळीराजा शेतकरी संघटनेची स्थापना पंढरपूर येथे पांडुरंगाच्या साक्षीने 9 नोव्हेंबर 2014 रोजी झालेली आहे कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळावा या प्रमुख उद्देशाने संघटनेची स्थापना करण्यात आलेली होती त्यावेळेस पंढरपूर व सोलापूर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी सामील झालेले होते परंतु कालांतराने आपापल्या स्वार्थापोटी बरेच पदाधिकारी संघटना सोडून गेलेले आहेत आज रोजी संघटनेचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे बळीराजा शेतकरी संघटना प्रामाणिक कार्यकर्ते च्या बळावर उभी आहे गेल्या पाच वर्षात संघटनेवर कोणताही आरोप झालेला नाही परंतु अलीकडे संघटनेत नवीन आलेल्या कार्यकर्त्यांनी संघटनेत गटबाजी करून संघटना तोडण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे त्यासाठी पंढरपूर या संघटना स्थापन ठिकाणी येऊनच गटबाजी करणाऱ्या व बंडखोर कार्यकर्त्याच्या वर कारवाई करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे.
आजच्या बैठकीमध्ये बळीराजा शेतकरी संघटने मधून श्री नितीन बागल श्री उन्मेश देशमुख, साजिद मुल्ला, रामदास खराडे, रमेश गणगे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे तरी पुढील काळामध्ये यांचा बळीराजा शेतकरी संघटनेची कोणताही संबंध राहणार नाही याची नोंद पत्रकार बंधू महसूल पोलीस राजकीय सामाजिक व सर्व संबंधित लोकांनी नोंद घ्यावी असे आवाहन पंजाबराव पाटील यांनी केले.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील प्रदेशाध्यक्ष बीजी काका पाटील
प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किसन खोचरे महिला आघाडी अध्यक्ष जयश्रीताई बोरा युवा आघाडी जिल्हाध्यक्ष राजेंद्र डोके जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी पाटील जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब सुपणवर,जिल्हा संघटक बाबुराव डोके कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर लोंढे जिल्हा उपाध्यक्ष रमेश भोसले व सर्जेराव शेळके जिल्हा सचिव संतोष बोरा माढा तालुका अध्यक्ष पंडित पाटील पंढरपूर तालुका अध्यक्ष रामेश्वर झांबरे मोहोळ तालुका अध्यक्ष शंकर भोसले मंगळवेढा तालुकाध्यक्ष दत्तात्रय वरपेकाका माढा युवा अध्यक्ष दत्तात्रय ननवरे,माहविर नागणे,दिपक पाटील,औधूबर सुतार,मारकड तसेच नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या यामध्ये जिल्हा कार्याध्यक्षपदी रमेश लंगोटे सोलापूर जिल्हा युवा आघाडी संपर्कप्रमुखपदी अनंता लामकाने पंढरपूर युवा तालुकाध्यक्षपदी लखन हाके पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदी रहीम मुलानी यांची निवड करण्यात आली मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते...