*हे तर एकमेकांचे भागीदार* ...
*कारखान्याचा सौदा करायला निघाले होते*..
*ॲड. दीपकदादा पवार यांचा भगीरथ भालके आणि अभिजीत पाटील यांच्यावर घणाघात*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
भगीरथ भालके आणि अभिजीत पाटील हे दोघे अनेक व्यवसायात भागीदार आहेत. त्यांनी विठ्ठल कारखाना खाजगीत चालवण्याचा प्रयत्नही केला होता. तो प्रयत्न सफल झाला नाही. आता युवराज पाटील यांच्या पाठीशी असलेला जनरेटा थोपवण्यासाठी हे दोघेही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सभासदांनी दोघांच्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आव्हान ॲड. दीपक पवार यांनी केले. ते गादेगाव येथील प्रचार सभेत बोलत होते. यावेळी युवराज पाटील, रावसाहेब पाटील,दामोदर पवार,बाळासो पाटील, मोहन बागल, अरुण मोलाने, मल्हारी खरात आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विठ्ठल साखर कारखान्याची निवडणूक मोठी रंगात आली आहे. निवडणुकीत तिरंगी सामना होत असल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मंगळवारी गादेगाव येथे युवराज पाटील यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. या सभेस नागरिकांनी मोठी गर्दी केली होती . या सभेत ॲड. दीपक पवार यांनी भगीरथ भालके आणि अभिजीत पाटील यांचा खरपूस समाचार घेतला.
अभिजित पाटील यांनी आपणाकडे कारखाना भाडेतत्त्वावर मागितला असल्याची माहिती भगीरथ भालके यांनी दिली होती. यापुढे जाऊन अभिजित पाटील यांनी यापोटी आपण ॲडव्हान्स रक्कमही भगीरथ भालके यांना दिली असल्याचे सांगितले होते. यावर पवार यांनी कडाडून टीका केली. विठ्ठल कारखान्याच्या खासगीकरणाचा डाव या दोघांनी आखला होता. इतर व्यवसायात हे दोघेही भागीदार आहेत . सभासद आणि संचालकांच्या परस्पर करण्यात येणारा हा डाव फसला गेला आणि विठ्ठल कारखान्याची निवडणूक लागली .या निवडणुकीत युवराज पाटील यांच्या पाठीशी असलेला जनाधार कमी करण्याची योजना या दोघांनीही आखली. आता दोघेही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सभासदांनी या दोघांवरही विश्वास ठेवू नये, असे मत ॲड. दीपक पवार यांनी व्यक्त केले. यावेळी दामोदर पवार, अमरजित पाटील, दिपक वाडदेकर,सागर यादव, छगन चव्हाण,बाळासो पाटील यांच्यासह इतरांनीही आपले विचार व्यक्त केल
*विठ्ठलच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे राहिलेले भगीरथ भालके आणि अभिजित पाटील हे दोघेही एकमेकांचे भागीदार आहेत. अनेक व्यवसायात त्यांची भागीदारी आहे. यामुळेच विठ्ठल कारखाना खाजगी करण्याचा डाव त्यांनी आखला होता. हा डाव फसल्याने आता निवडणूक रिंगणात उभे आहेत. सभासदांनी त्यांच्यावर विश्वास ठेवू नये ,असे मत ॲड. दीपक पवार यांनी व्यक्त केले आहे*.