स्पर्धेतून मिळणाऱ्या विजयापेक्षा स्पर्धेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेणे हे महत्वाचे
- पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम
स्वेरीत ‘स्पिरीट २ के २२’ हा तांत्रिक संशोधनपर उपक्रम संपन्न
पंढरपूरः ‘स्पर्धेत विद्यार्थ्यांचा विजय महत्वाचा नसतो, तर आपण त्या स्पर्धेत किती सहभागी होतो हे खूप महत्त्वाचे असते. स्पर्धेच्या माध्यमातून अनुभव घेणे महत्वाचे असते. तो अनुभव आपल्याला पुढील आयुष्यात करिअरच्या दृष्टीने खूप काही शिकवत असतो.’ असे प्रतिपादन पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा डीवायएसपी विक्रम कदम यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. सोमनाथ ठिगळे यांच्या नेतृत्वाखाली आयकॉनच्या माध्यमातून राज्यस्तरीय ‘स्पिरीट २ के २२’ या एक दिवसीय तांत्रिक संशोधन महोत्सवाच्या उदघाटनाच्या बक्षिस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिक्षक विक्रम कदम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. सकाळच्या सत्रात कार्यक्रमाचे उदघाटन स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पॉलीटेक्निकचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्तविकात विभागप्रमुख डॉ. ठिगळे यांनी ‘स्पिरीट २ के २२’ या कार्यक्रमासंबंधी नियमावली आणि सविस्तर माहीती दिली. ‘स्पिरीट २ के २२’ या राज्यस्तरीय स्पर्धेत बीजीएमआय (पब्जी) आणि व्हर्च्युअल कॅम्पस हे इव्हेंन्टस् ऑनलाइन झाले. प्रोग्रामर या उपक्रमात स्पर्धकांनी आपले बौध्दीक कौशल्य दाखविले तसेच स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला नुकतेच ‘नॅक’ अर्थात ‘नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन कौन्सिल’ चे ३.४६ सीजीपीए सह ‘ए प्लस’ मानांकन मिळाल्यामुळे स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांचा पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वेरीच्या कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंग मधील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय नामांकित कंपनीमध्ये (टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज् लिमिटेड, एचसीएल, कॅपजीमिनी, पर्सिस्टंट, टेक महिंद्रा, असेन्चर, बाईजूज, जीएमएस,एनटीटी डाटा) निवड झाल्याबद्दल अक्षय माने, ऋषिकेश पांढरे, सोहम नलवडे, प्रशांत जालगीरे, जितेंद्र बागल, प्रतिक यादव, ओंकार पवार, दिग्विजय खलाटे, अभिजीत कारंडे, गौरव वाघमारे, सोनाली लांडगे, सारिका हांडे, पल्लवी हेबळे, वैष्णवी जगनाडे, अक्षदा देशपांडे, विविता ढेकळे, मोनाली शिंदे, सिद्धी शितोळे, काजल डुबल इ. विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच इतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी बाहेरून आलेले स्पर्धक, प्रा.व्ही.डी जाधव, प्रा.पी.डी.माने, स्पिरिटचे समन्वयक प्रा.प्रमोद माने, सहसमन्वयक प्रा.व्ही.व्ही.झांबरे, तसेच अन्य मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमाच्या अध्यक्ष प्रसन्ना थळपती, उपाध्यक्ष प्रद्या रेपाळ, सचिव विषाखा सावळकर, सहसचिव प्रशांत लांडगे, खजिनदार रोहित कवितके, कार्यक्रम समन्वयक राहुल हिंगमिरे यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. पो.उ.अधिक्षक कदम यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसंदर्भात अतिशय उत्तमरित्या मार्गदर्शन करून यंदाच्या वर्षी स्वेरीच्या १६ हून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळाल्याचे ऐकून सर्व गुणवंतांचे कौतुक केले. यामध्ये महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातून एकूण ४७२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सूत्रसंचालन विठ्ठल शिरसले, साक्षी रुद्रकंठावार आणि आयेशा मुजावर यांनी केले तर आभार विभागप्रमुख डॉ.सोमनाथ ठिगळे यांनी मानले.