रांझणी विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पदी मा.भारत अण्णा दांडगे आणि व्हाईस चेअरमन पदी महादेव हरी सप्ताळ यांची निवड.

 रांझणी विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पदी मा.भारत अण्णा दांडगे आणि व्हाईस चेअरमन पदी महादेव हरी सप्ताळ यांची निवड...

प्रतिनिधी:-



गावोगावी सोसायटी निवडणुका अत्यंत चुरशीने होत आहेत. मात्र पंढरपूर तालुक्यातील रांझणी गावातील रांझणी विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली. सोसायटीच्या बिनविरोध निवडीनंतर गावात जल्लोष करण्यात आला.



विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी मा.भारत अण्णा दांडगे व्हा.चेअरमन पदी मा.महादेव हरी सप्ताह यांची निवड झाली आहे.तर संचालक पदी किसन नारायण भुताडे, संदीप पांडुरंग गांडुळे,महादेव दत्तू ढोले, आनंदराव संदिपान शिंदे,अगतराव प्रल्हाद चौगुले,

तानाजी सिताराम भाकरे, चंद्रकांत कृष्‍णा पवार,विष्णू मारुती काळे,अशोक नामदेव घोडके, विमल सर्जेराव घाडगे, कांचना साहेबराव घाटूळ यांची सोसायटीच्या संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली. 

आपला देश हा कृषिप्रधान देश असून शेतकरी संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ देण्यामध्ये गावपातळीवरील विविध कार्यकारी सोसायटीचा मोलाचा वाटा असतो.त्यामुळे  रांझणी विविध कार्यकारी सोसायटी सभासद शेतकऱ्यांचे हित जोपासेल,असा विश्वास नूतन चेअरमन भारत दांडगे यांनी दिला आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.