पशुसेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा - स्वेरीचे सचिव डॉ.बी.पी. रोंगे
स्वेरीत ‘जागतिक पशुवैद्यक दिन’ साजरा
पंढरपूर- 'पशुसेवा हीच भूतलावरील सर्वश्रेष्ठ सेवा आहे. कारण ज्या पशूंना आपले दुःख, वेदना हया सांगता येत नाहीत. त्यांचं दुःख, आजार जाणून घेऊन त्यांच्यावर उपचार करणे हे पशुवैद्यकांचं कार्य नितांत आदरणीय, स्तुत्य आणि अनुकरणीय असे आहे.’ असे प्रतिपादन गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी केले.
स्वेरीच्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉल’ मध्ये पंढरपूरच्या ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान द्वारा आयोजिलेल्या ‘जागतिक पशुवैद्यक दिना’च्या कार्यक्रमात डॉ. रोंगे उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. यावेळी प्रतिष्ठानतर्फे सेवानिवृत्तांचा सत्कार व दुग्ध व्यवसायाशी संबंधित मार्गदर्शनपर चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पशुवैद्यक डॉ.टी.एन.बेले हे होते. व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.विश्वासराव मोरे, सचिव डॉ.अनिल सरदेशमुख, सहाय्यक आयुक्त डॉ.सत्यवान भिंगारे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ.प्रियांका जाधव हे उपस्थित होते. प्रास्तविकात डॉ.विश्वासराव मोरे हे कार्यक्रमाचा हेतू विशद करताना म्हणाले कि, ‘आयुष्यातील ३५-३८ वर्षे पशुसेवेला वाहून घेतलेल्या पशुवैद्यकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे. त्यांच्या कार्यापासून नवीन पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल.’ यावेळी डॉ.टी.एन.बेले, डॉ.अनिल सरदेशमुख, डॉ.नंदकुमार होनराव, डॉ.रमेश चव्हाण, डॉ.सदानंद टाकणे, पशुधन पर्यवेक्षक जयंत कुलकर्णी, दत्तात्रय राऊत, रमेश खडतरे यांचा स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पहार देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. बेले यांनी अध्यक्ष व सचिव यांचे आभार मानले. डॉ.प्रियांका जाधव यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले तसेच डॉ.भिंगारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ.विश्वासराव मोरे यांनी रेखाटलेल्या दूध व्यवसाय चित्राचे विमोचन केले. नंतर स्वरसाधना या गाण्यांच्या कार्यक्रमानंतर सांगता करण्यात आली. पशु चिकित्सालयामध्ये डॉ. मोरे यांनी श्वानदंश प्रतिबंधक लसीकरणाचे उदघाटन केले. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला नुकतेच ‘नॅक’ अर्थात ‘नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन कौन्सिल’ चे ३.४६ सीजीपीए सह ‘ए प्लस’ मानांकन मिळाल्यामुळे प्राचार्य डॉ.रोंगे सरांचा सत्कार महात्मा फुले यांची पगडी, घोंगडे व आसूड देऊन करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील अनिष्ट, अवांछित, विद्वेषमूलक बाबींचे निर्दालन करण्यासाठी आसूड देऊन हा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ.एन.एम. आसबे, अविनाश रसाळे, सागर धोत्रे, संतोष माने, कुणाल सोनंदकर, सचिन डुबल, गोरख फराटे, बालाजी सुरवसे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार डॉ.अनिल सरदेशमुख यांनी मानले.