सोलापूर शहरात चित्रनगरी उभी करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी घोषणा आमदार सुभाषबापू देशमुख यांनी केली.

 

सोलापूर शहरात चित्रनगरी उभी करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी घोषणा आमदार सुभाषबापू देशमुख यांनी केली.



सोलापूर सोशल फाउंडेशनच्या श्रीमंती सोलापूरची पुरस्कार वितरण सोहळ्यात  ते  बोलत होते.

या कार्यक्रमाला सोलापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील व  ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांची प्रमुख उपस्थिती होती. सोलापूर सोशल  फाउंडेशनच्या संचालिका मयुरी वाघमारे शिवगुंडे व पुरस्कार निवड समिती सदस्य अरविंद जोशी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

तालवाद्य वादक नागेश भोसेकर, पर्यावरण व वन्यजीव संरक्षक संतोष धाकपाडे, सुंद्रीवादक कपिल विष्णू जाधव, आकाशवाणी सोलापूर केंद्राचे अभियंता दिलीप मिसाळ, ध्वनिमुद्रिका संग्राहक मोहन सोहनी व जयंत राळेरासकर यांना हे पुरस्कार देण्यात आले.


सत्काराला उत्तर देताना संतोष धाकपाडे यांनी आपला पुरस्कार आपल्या दिवंगत वडलांना समर्पित करत असल्याचे सांगितले. वन्यजीवांचे संरक्षण करताना आलेले अनुभव त्यांनी सांगितले.

नागेश भोसेकर यांनी, जन्मभूमी सोलापूरचा सन्मान आपल्याला महत्त्वाचा वाटतो असे सांगताना, कलाजीवनातील अनुभव सांगितले. कलाकारांना रोज नव्या आव्हानांना तोंड द्यावे लागते, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात पारंपरिक वाद्यांच्या प्रशिक्षणाची सोय नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

श्री. धैर्यशील पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना, शहरांची श्रीमती पैशात न मोजता कलागुणांत मोजली जावी असे प्रतिपादन केले. एखादी कला अवगत केली तर जीवन चांगले जगता येते म्हणून सर्वांनी कला व छंद आपलेसे करावेत असे आवाहन त्यांनी केले.

ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी मार्गदर्शन करताना,  सुभाष बापू देशमुख हे जिल्ह्याच्या विकासाची निश्चित दिशा पकडून काम करणारे नेते आहेत असे प्रतिपादन केले. सोलापुरात चित्रनगरी ऊभी करावी अशी सूचना त्यांनी मांडली.

आमदार सुभाषबापू देशमुख यांनी याप्रसंगी बोलताना, सोलापूरकरांनी साथ दिली तर सोलापूरचा विकास चांगला करता येईल असा विश्वास व्यक्त केला.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले. प्रा. नरेंद्र काटीकर यांनी प्रास्ताविक केले तर प्रकाश पवार यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad