*साक्षात पंढरीचा पांडूरंग धाराशिव कारखान्याच्या माध्यमातून उभा आहे* :- तहसीलदार व्यंकटेश मुंढे
( धाराशिव साखर कारखाना यु३ लोहा नांदेड येथे ३लाख ५१,१११ साखर पोती पूजन संपन्न)
*धाराशिवच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत येणारा काळात चांगला पाऊसकाळ पडेल* - हवामान अभ्यासक पंजाबराव डक
प्रतिनिधी/-
आपल्या
लोहा तालुक्यातील शिवणी जामगा येथील धाराशिव साखर कारखाना युनिट क्र.३ येथे हवामान अभ्यासक श्री.पंजाबराव डक-पाटील यांच्या शुभहस्ते *"३लाख ५१हजार १११"* साखर पोती पूजन करण्यात आले.
कायमच शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून साखर कारखाने यशस्वी चालवित असल्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले. भागातील संपूर्ण ऊस गाळपास आणल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही याची खात्री देखील शेतकऱ्यांनी घ्यावी असे अवाहन केले.
लोहा तालुक्यातील शिवणी जामगा येथील धाराशिव साखर कारखान्याने यंदा चांगला कारखाना चालविला असून उच्चांक गाळप सुरू असून साखर पोती पूजन करताना आनंद होतो आहे. पुढील हंगामात अजून उच्चांक गाळप करावे यानिमित्त शुभेच्छा दिल्या. कारखान्यामुळे असंख्य तरूणाच्या हाताला काम मिळाले असून हजारो शेतकऱ्यांला न्याय देण्याची भूमिका देत आहेत. यामुळेच लोहा नगरीत साक्षात पंढरीचा पांडूरंग धाराशिव कारखान्याच्या माध्यमातून उभा असल्याचे तहसीलदार व्यंकटेश मुंढे यांनी सांगितले.
हवामान अभ्यासक डक-पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना मदत करणे हि प्रामाणिक भूमिका पार पाडत आलो आहे. शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत लागवड कधी करावी?पाऊसकाळ कधी येणार अशी सखोल माहीती पोचवणे व त्यापासून शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान थांबवणे हाच माझा प्रयत्न असल्याचे सांगितले. यावेळी धाराशिव साखर कारखान्याने विक्रमी गळीत केल्याचा उल्लेख केला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हवामानविषयी मार्गदर्शन केले.
याप्रंसगी लोहा तहसीलदार श्री.व्यंकटेशजी मुंढे, सोनखेड उप निरीक्षक श्री.विशाल भोसले, लोहा पोलीस अधिकारी श्री.सोनकांबळे यासह धाराशिव साखर कारखान्याचे संचालक श्री.भागवत चौगुले, श्री.सजंय खरात, श्री.सुहास शिंदे, तसेच श्री.आकाश चिगरे जनरल मॅनेजर श्री.वडजे, चिफ केमिस्ट श्री.पेटे, चिफ इंजिनीअर श्री.पाटील, श्री.अक्षय रणदिवे, श्री.ओकार पाटील, श्री.गणेश रणदिवे यासोबत असंख्य शेतकऱी सभासद, कर्मचारी बांधव उपस्थित होते.