विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान कडून प्रशांत माळवदे यांचा सन्मान

 विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान कडून प्रशांत माळवदे यांचा सन्मान 



पंढरपूर प्रतिनिधी 


पंढरपूर येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती महोत्सवानिमित्त डिजिटल मीडियातील उल्लेखनीय कार्याबद्दल पत्रकार प्रशांत माळवदे यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते शाल, फेटा, हार, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. 

यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डी राज सर्वगोड समितीचे अध्यक्ष श्रीकांत चंदनशिवे सचिव ज्ञानेश्वर कांबळे, डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण नागणे, शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर भैय्या देशमुख, माजी नगराध्यक्ष उज्वला भालेराव, प्रा.अनिल ननवरे,सल्लागार नितीन काळे,प्रा.सुदाम गायकवाड, प्रा. राजुभाई मुलानी ,अपराजित सर्वगोड, रामदास नागटिळक,विशाल आर्वे आदि मान्यवर उपस्थित होते.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे, अन्न आयोग अध्यक्ष महेश ढवळे, एलआयसी विकास अधिकारी बी एस चौगुले, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया गायकवाड, पंचायत समिती सदस्य विजय शिंदे,अक्काताई लोखंडे,सरपंच रणजीत जाधव, न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य के डी शिंदे,वसंतराव काळे हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय काळे,संस्कार इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष सीताराम माने व समस्त ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad