एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे पायथॉन प्रोग्रामिंगवर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

 एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे पायथॉन प्रोग्रामिंगवर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न



 एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे "पायथॉन प्रोग्रामिंगवर फॉर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग: बेसिक ॲड प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन” या विषयावर द्वितीय वर्ष विद्युत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.


या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना पायथन प्रोग्रामिंगची मूलभूत माहिती देणे तसेच डेटा अ‍ॅनालिसिस, ऑटोमेशन आणि सिम्युलेशन टूल्स यांसारख्या विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील त्याच्या व्यावहारिक उपयोगांची ओळख करून देणे हा होता. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.


कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोडेस्प्लिट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड येथील लीड इंजिनियर-क्यूए श्री. अनिकेत खरात तसेच आयइइइ स्टूडेंट ब्रांच चेअर कु. अनघा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी पायथनचे मूलभूत संकल्पना, उद्योगातील प्रत्यक्ष वापर आणि आधुनिक तांत्रिक क्षेत्रातील त्याचे महत्त्व याबाबत सखोल माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंग कौशल्ये आधुनिक विद्युत अभियांत्रिकी उपाययोजनांमध्ये कशी वापरता येतात याची स्पष्ट समज मिळाली.


कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.किशोर जाधव यांनी कार्यशाळेचे सुयोग्य नियोजन करून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.


हा कार्यक्रम संस्थेचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी तसेच विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. के. शिवाशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.


अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांचा विकास होऊन त्यांना उद्योगाभिमुख, व्यावहारिक शिक्षण मिळण्यास मोठी मदत होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad