स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या क्षितिजा उराडे यांची ‘फोर्विया फोरेसिया’ या कंपनीत निवड! प्लेसमेंटद्वारे नोकरीच्या तब्बल ४७३ पेक्षा जास्त संधी


स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या क्षितिजा उराडे यांची ‘फोर्विया फोरेसिया’ या कंपनीत निवड!


प्लेसमेंटद्वारे नोकरीच्या तब्बल ४७३ पेक्षा जास्त संधी 



पंढरपूरः ‘फोर्विया फोरेसिया’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या क्षितिजा हिरामण उराडे यांची कॅम्पस प्लेसमेंट मधून निवड करण्यात आली असून शै. वर्ष २०२५-२६ मध्ये प्लेसमेंटद्वारे नोकरीच्या तब्बल ४७३ पेक्षा जास्त संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तसेच कांही कंपन्यांचे निकाल अद्याप बाकी आहेत.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. पी.रोंगे यांनी दिली.

       ‘फोर्विया फोरेसिया’ ही जगातील अग्रगण्य ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान कंपनी आहे. या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर रु.२.६ लाख कोटी इतका आहे. या नामांकित कंपनीच्या समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील क्षितिजा हिरामण उराडे या विद्यार्थिनीची निवड केली असून त्यांना वार्षिक रु.३ लाख इतके पॅकेज मिळाले आहे. विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे प्रयत्न आणि स्वेरीतील शैक्षणिक कल्चर यामुळेच स्वेरीतील विद्यार्थ्यांना नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांना स्वेरीमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये अॅप्टिट्यूड, कम्युनिकेशन स्किल, एडवॉन्स टेक्निकल ट्रेनिंग, मॉक इंटरव्यूव, ग्रुप डिस्कशन, सॉफ्टवेअर ट्रेनिंग या व्यतिरिक्त जागतिक स्तरावर संधी मिळण्यासाठी जापनीज लैंग्वेज ट्रेनींग तसेच जीआरई, टोफेल या संदर्भात मार्गदर्शन केले जाते. सदर विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी ‘फोर्विया फोरेसिया’ या कंपनीत निवड झालेल्या क्षितिजा उराडे यांचे अभिनंदन केले.


चौकट: स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना शै. वर्ष २०२५-२०२६ मध्ये प्लेसमेंटद्वारे नोकरीच्या तब्बल ४७३ पेक्षा जास्त संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अजूनही कांही कंपन्यांचे रिझल्ट्स येणे बाकी आहे. विद्यार्थ्यांची चिकाटी, स्वेरीची आदरयुक्त शिक्षणसंस्कृती, रात्र अभ्यासिका, विद्यार्थ्यांना दिले जाणारे विविध प्रकारचे प्रशिक्षण आदी बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये होणारी निवड होय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.