पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थिनीची लोधा कन्स्ट्रक्शनमध्ये घवघवीत भरारी* *स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या आरती ढेरेची वार्षिक ५.५ लाखांच्या आकर्षक पॅकेजवर निवड*

 *पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थिनीची लोधा कन्स्ट्रक्शनमध्ये घवघवीत भरारी*

*स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या आरती ढेरेची वार्षिक ५.५ लाखांच्या आकर्षक पॅकेजवर निवड*



पंढरपूर : प्रतिनिधी

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षण व प्रभावी प्रशिक्षणाचा आणखी एक उल्लेखनीय ठसा उमटला आहे. महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थिनी कु. आरती शिवाजी ढेरे हिने देशातील अग्रगण्य रिअल इस्टेट व बांधकाम क्षेत्रातील नामांकित लोधा कन्स्ट्रक्शन या कंपनीत वार्षिक ५.५ लाख रुपयांच्या आकर्षक वेतन पॅकेजवर नोकरी मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.


मुळची वरकुटे-माळवाडी (ता. माण, जि. सातारा) येथील असलेल्या आरतीने आपल्या गुणवत्तेच्या, सातत्यपूर्ण परिश्रमांच्या आणि महाविद्यालयाकडून मिळालेल्या उद्योगाभिमुख प्रशिक्षणाच्या बळावर ही यशस्वी झेप घेतली आहे.


लोधा कन्स्ट्रक्शन ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक असून देशातील अनेक महानगरांमध्ये उच्च दर्जाचे निवासी, व्यावसायिक व लक्झरी प्रकल्प उभारण्यासाठी प्रसिद्ध आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार बांधकाम, पर्यावरणपूरक संकल्पना आणि जागतिक दर्जाच्या सुविधा यामुळे कंपनीने भारतीय बांधकाम क्षेत्रात विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे. अशा प्रतिष्ठित कंपनीमध्ये विद्यार्थिनीची निवड होणे ही महाविद्यालयासाठी मोठी अभिमानाची बाब असल्याचे विभागप्रमुख डॉ. यशवंत पवार यांनी सांगितले.


महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल विद्यार्थ्यांना उद्योगांच्या अपेक्षांनुसार सक्षम करण्यासाठी नियमितपणे ॲप्टिट्यूड प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्य विकास, सॉफ्ट स्किल्स, मॉक इंटरव्ह्यू, गटचर्चा आणि व्यक्तिमत्त्व विकास यांसारखे विविध उपक्रम राबवत असून त्याचा विद्यार्थ्यांना सातत्याने लाभ होत आहे. याच प्रयत्नांचे फलित म्हणून विद्यार्थ्यांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये आकर्षक वेतनावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.


आरती ढेरे हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ. अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरू, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अमोल कांबळे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून उज्ज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि सक्षम प्लेसमेंटच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याची सिंहगडची परंपरा अशाच यशस्वी विद्यार्थ्यांमुळे अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad