पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्याचा प्लेसमेंट विक्रम: ७ कंपन्यांची ऑफर: ७.५ लाखांचे पॅकेज*

 *पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्याचा प्लेसमेंट विक्रम: ७ कंपन्यांची ऑफर: ७.५ लाखांचे पॅकेज*



पंढरपूर : प्रतिनिधी


उद्योगविश्वात दर्जेदार अभियंते घडविणाऱ्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी (ता. पंढरपूर) ने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट कॅम्पस प्लेसमेंटची छाप उमटवली आहे. महाविद्यालयाच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी सौरभ संजय दिघे (रा. वाडेगाव, ता. सांगोला) याची तब्बल सात नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली असून, त्याला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये वार्षिक ७.५ लाख रुपयांच्या आकर्षक पॅकेजवर नोकरीची संधी मिळाली आहे.


सौरभची रिलायन्स इंडस्ट्रीज (₹७.५ लाख), कॉग्निझंट (₹४ लाख), एलटीआय माइंडट्री (₹४ लाख), पॉलीकॅब (₹३.६ लाख), एरोसिस, मेकर्स स्ट्राइव्ह आणि फेव्हिनो इंडस्ट्रीज ( प्रत्येकी ₹३ लाख) अशा प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. त्याने नुकतीच कॉग्निझंटमध्ये इंटर्नशिप पूर्ण केली असून, ऑगस्ट २०२६ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये रुजू होणार आहे.


महाविद्यालयाच्या प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना उद्योगजगताच्या गरजेनुसार तांत्रिक कौशल्ये, सॉफ्ट स्किल्स, ॲप्टिट्यूड ट्रेनिंग, कम्युनिकेशन स्किल्स, मॉक इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन, कोडिंग प्रॅक्टिस, उद्योगतज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे नियमित प्रशिक्षण दिले जाते. या सर्वांगीण प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना देशातील अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगाराच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध होत आहेत.


महाविद्यालयात दरवर्षी विविध राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कॅम्पस भरती प्रक्रिया आयोजित केल्या जात असून, विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच आकर्षक वेतनाच्या नोकऱ्या मिळत आहेत. त्यामुळे एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षण आणि उज्ज्वल करिअर घडविणारे विश्वासार्ह केंद्र म्हणून ओळख निर्माण करत आहे.

"गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापक, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण उत्कृष्ट प्लेसमेंट" हीच एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरची यशस्वी परंपरा असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.


सौरभ दिघेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर काटेकर, यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.