लोटस इंग्लिश स्कूलमध्ये 'व्यक्तिमत्व विकास शिबिर' उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना मिळाला वाव


लोटस इंग्लिश स्कूलमध्ये 'व्यक्तिमत्व विकास शिबिर' उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना मिळाला वाव



पंढरपूर- पंढरपूर पंचक्रोशीत आपल्या विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना व्यासपीठ मिळावे या मुख्य उद्देशाने संस्थापक डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २७ मार्च ते दि. ०६ एप्रिल २०२६ या कालावधीत 'व्यक्तिमत्व विकास शिबिरा’चे आयोजन केले होते. या शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. 

      या शिबिराचे उदघाटन संस्थेच्या संस्था सदस्या सौ. मिनाक्षी रोंगे, श्रीमती वंदना रोंगे, सौ. अलका बागल, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.स्नेहा रोंगे, स्कूलच्या प्राचार्या डॉ.जयश्री भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे आणि क्रीडा कौशल्यांचे दर्शन घडवले. नऊ दिवसांच्या या शिबिरात केवळ शारीरिक खेळच नव्हे, तर बौद्धिक आणि मानसिक विकासासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रोप मल्लखांब, लाठी-काठी, योगा, कराटे, नेमबाजी, तलवारबाजी यांसारख्या साहसी खेळांसोबतच चित्रकला, वक्तृत्व, डान्स आणि एरोबिक्स अशा विविध स्पर्धा पार पडल्या. विविध स्पर्धां प्रकारात कराटे स्पर्धेत अथर्व नवनाथ भोसले, सिद्धार्थ निखिल कोंडुसकर, राजवी अविनाश मोटे-पाटील, समृद्धी सतीश झिरपे, लाठी-काठी स्पर्धेत श्रुती सोमनाथ लोणकर, श्रद्धा मोरे, श्रीराम समाधान लवटे, संग्राम ज्ञानेश्वर देशमुख तसेच जिम्नॅस्टिक खेळात समृद्धी मोरे, जिजा सुरज रोंगे, वेदांत कुंभार, वेदांत कदम, रोप मल्लखांब मध्ये शौर्य नितीन गायकवाड, प्रदीप विकास राऊत, इशिता बालाजी बनसोडे, भक्ती कुरे, नृत्य प्रकारात त्रिशा सुडके, सई घोडके, क्षितिज शिवशरण, गौरव बनसोडे तर बेस्ट कमांडो म्हणून शौर्य प्रसाद चव्हाण, रुजुला ज्ञानेश्वर विजागत हे विद्यार्थी विजेते ठरले. नामांकित प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेचे प्रशस्त व हवेशीर वातावरण हे या शिबिराचे मुख्य आकर्षण होते. विद्यार्थ्यांसाठी टी-शर्ट, सहभाग प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्हे, थंड पेय यांची उत्तम सोय करण्यात आली होती. तसेच वन मिनिट शो,जादूचा शो आणि संगीत खुर्ची, मजेदार गाणी यांसारख्या 'फनी गेम्स'मुळे विद्यार्थ्यांनी या शिबिराचा आनंद मनमुरादपणे लुटला. शिबिराच्या समारोप प्रसंगी विविध स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव संस्थेचे अध्यक्ष बी.डी. रोंगे व माजी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विश्वासराव मोरे व पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मयुर वागज, अस्मिता घोलप, प्रकाश शिवशरण, राज हजारे, सुहास जाधव, सौरभ नेहतराव यांच्यासह शाळेतील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. पालकांनीही शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा शिबिरांमुळे मुलांमध्ये शिस्त आणि आत्मविश्वास वाढत असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका किशोरी भोसले व कल्पना जगताप यांनी केले तर शिक्षिका प्रांजली देशमुख यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.