एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे GATE परीक्षेसंदर्भातील मार्गदर्शन सत्र यशस्वीरित्या संपन्न*

 *एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे GATE परीक्षेसंदर्भातील मार्गदर्शन सत्र यशस्वीरित्या संपन्न*



पंढरपूर, ऑक्टोबर २०२५ - सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी (पंढरपूर) येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या वतीने GATE (Graduate Aptitude Test in Engineering) परीक्षेविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

या सत्राचे प्रमुख वक्ते प्रा. सिद्धेश पवार होते. GATE परीक्षेत तीन वेळा यश मिळवलेले आणि स्वतःचा अनुभव असलेले प्रा. पवार यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचे शैक्षणिक व व्यावसायिक महत्त्व, यशस्वी तयारीसाठी योग्य अभ्यासक्रम रचना, वेळेचे नियोजन, आणि उपयुक्त अभ्याससामग्री यावर मोलाचे मार्गदर्शन केले.

त्यांनी GATE परीक्षेद्वारे मिळू शकणाऱ्या IITs, NITs, IISc यांसारख्या नामांकित संस्थांमधील प्रवेशसंधी, तसेच PSU (Public Sector Undertakings) मध्ये थेट नोकरीच्या संधी यांचे विस्तृत विवेचन केले. त्यांनी स्पष्ट केले की ही परीक्षा फक्त पदव्युत्तर शिक्षणासाठीच नव्हे, तर करिअरमध्ये उत्तुंग यशासाठी एक सुवर्णसंधी आहे.

या मार्गदर्शन सत्रात द्वितीय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उपक्रमाचे आयोजन विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात विभागातील सर्व प्राध्यापकवृंद व विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad