*"स्वच्छतेचा संकल्प - स्वच्छ भारत, सुंदर भारत* !"
*राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सिंहगडच्या तरुणांचा प्रेरणादायी उपक्रम*
पंढरपूर, ११ ऑक्टोबर २०२५:
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पंढरपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता महाविद्यालयीन परिसरात करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या अभियानांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी संपूर्ण महाविद्यालयीन परिसरात सफाई मोहीम राबवून प्लास्टिक वस्तू तसेच अन्य कचरा गोळा केला. पर्यावरणपूरक सवयी अंगीकाराव्यात आणि स्वच्छतेचा संदेश सर्वदूर पोहोचवावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख, समन्वयक प्रा. सुमित इंगोले यांनी केले. यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकारी प्रा. गुरुराज इनामदार व प्रा. अर्जुन मासाळ, प्रा. अजित करांडे, प्रा. सिध्देश्वर गंगौडा यांनी विशेष सहकार्य केले.
स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक अध्यक्ष अविराज साळुंखे, उपाध्यक्ष बिलाल शेख, सचिव राज नागणे, सहसचिव संकेत खडतरे, कोषाध्यक्ष ओंकार पुजारी, सोशल मीडिया संयोजक विजय पवार आणि इतर ५० हून अधिक स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवून विशेष परिश्रम घेतले.
महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कॅम्पस डायरेक्टर डॉ. कैलाश करांडे यांनी सर्व स्वयंसेवकांचे कौतुक करत, "स्वच्छता हीच खरी सेवा आहे. असे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करतात," असे प्रतिपादन केले.
स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून "स्वच्छ, सुंदर सिंहगड" निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या उपक्रमामुळे समाजात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होण्यास निश्चितच मदत झाली.

