सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे पारधी समाजासोबत दीपावली सण साजरा*

 *सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे पारधी समाजासोबत दीपावली सण साजरा*  



सोलापूर, दि. 20 ऑक्टोबर 2025: सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या *ऑपरेशन पहाट* उपक्रमांतर्गत मोहोळ पोलीस ठाण्यामार्फत चिंचोलीकाटी येथे पारधी समाजातील 115 कुटुंबांसोबत दीपावली सण उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून समाजातील कुटुंबांना दीपावलीनिमित्त फराळ आणि संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.


यावेळी आदिवासी पारधी समाजाचे अध्यक्ष श्री. मच्छिंद्र काळे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचा वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित पारधी समाजातील महिला, पुरुष आणि तरुणांना श्री. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी एकात्मिक प्रकल्प विकास आणि पारधी समाजासाठी उपलब्ध असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. सुशिक्षित तरुणांना शिक्षणानुसार रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय स्तरावरून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, महिलांसाठी शिलाई मशीन, पापड बनवण्याची मशीन आणि पिठाची गिरणी यासारख्या सुविधा अनुदानावर उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून, सर्वांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


या कार्यक्रमाला भांबेवाडी, नरखेड, चिंचोलीकाटी, भोयरे आदी भागातील पारधी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत शेडगे, पोहेकॉ श्री. गजानन माळी, श्री. दयानंद हेंबाडे, श्री. संदीप सावंत, श्री. अमोल जगताप, श्री. डवले, श्री. स्वप्निल कुबेर तसेच आदिवासी पारधी संघटनेचे श्री. मच्छिंद्र काळे, श्री. जेऊर काळे आणि सुमारे 150 समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad