मोहोळ तालुक्यातील पिकांचे सरसकट पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी - रामदास भाई चवरे
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांना सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन मालक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिले निवेदन
प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यात मागील पंधरा दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे तसेच सीना व भीमा नदीला प्रचंड पुर आल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. यामध्ये शेतातील पिके, जनावरे, धान्ये वाहुन गेली आहेत,लोकांचा संसार पूर्णवणे पाण्यात वाहून गेला आहे. तसेच शेतातील फळ पिके संपुर्ण पणे वाया गेली आहेत. तरी संपूर्ण तालुक्यातील पिकांचे सरसकट तातडीने पंचनामे करुन आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन मालक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते रामदास भाई चवरे यांनी आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्याकडे केली.
यावेळी तालुकाध्यक्ष प्रकाश भाऊ चवरे, बाजार समितीचे उपसभापती प्रशांत बचूटे, महावीर चटके,सज्जन लोंढे उपस्थित होते.
मोहोळ तालुक्यातील सीना नदी व भीमा नदी काठच्या गावांबरोबर तालुक्यातील इतर मंडळातील सर्व गावातील पिकांचे सरसकट पंचनामे करून कोल्हापूर, सांगली पुराच्या वेळी NDRF च्या निकषापेक्षा चौपट मदत केली होती त्या प्रमाणे एकरी 40000 रुपयांची आर्थिक मदत तात्काळ जाहिर करावी.शेतकऱ्यांवर ओढवलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरसकट संपूर्ण कर्जमाफी तातडीने जाहिर करावी.पुरात वाहुन गेलेल्या व अति पावसामुळे तसेच पुरामुळे मेलेल्या जनावरांना चालू बाजार भावा प्रमाणे मदत मिळावी.अति पावसामुळं ज्या घरांची पडझड झालेली आहे त्यांचे पंचनामे करून त्यांनी तात्काळ मदत जाहिर करावी.नुकसान भरपाई साठी पंचनामे करताना फॉर्मर आयडी, ई-पिक पाणी नोंद यांसारख्या अटी शिथिल कराव्यात,तालुक्यातील पर्जन्यमापे ही निकृष्ट दर्जाची असल्याने योग्य मोजमाप झाले नाही तरि ती मोज मापे ग्राहय धरु नये.
अशा विविध मागण्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्याकडे करण्यात आल्या.

