आमदार समाधान आवताडे अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या बांधावर; महसूल आणि कृषी विभागाच्या कामकाजाची केली पाहणी सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत मिळवून देणार : आ. अवताडे

 आमदार समाधान आवताडे अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या बांधावर; 


महसूल आणि कृषी विभागाच्या कामकाजाची केली पाहणी


सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत मिळवून देणार : आ. अवताडे



मंगळवेढा : प्रतिनिधी 


मंगळवेढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून आ समाधान आवताडे यांनी आज दिनांक 26 रोजी लोणार,हुन्नूर, मारोळी, शिरनांदगी, चिकलगी, निंबोणी, खवे येथील आदी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत निसर्गाच्या अवकृपने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीवर हात ठेवत दिलासा देऊन सरकारच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिले तसेच

गेल्या पंधरा दिवसापासून मंगळवेढा तालुक्यांमध्ये पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून मातीचे बांध, रस्ते वाहून गेले आहेत. खरीप पिके, फळबागा यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मका, कांदा, तुर,सूर्यफूल, बाजरी, टोमॅटो, मिरची, कांदा, भुईमुग, उडीद, दोडका, द्राक्षे डाळिंब या खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. या संकटाशी सामना करण्याचे बळ देण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देऊन परिस्थिती जाणून घेत त्यांची व्यथा जाणून घेतल्या. शेतातील उभ्या पिकांचे, घरांचे झालेल्या नुकसानीमुळे सर्व ठिकाणचे जनजीवन विस्कळित झाले आहे. याची त्यांनी पाहणी केली.

याप्रसंगी आमदार आवताडे यांनी सर्व शेतकऱ्यांना सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. असा विश्वास देऊन पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि नुकसान झालेल्या एक ही शेतकरी पंचनामा करण्यावाचून राहिला नाही पाहिजे याची काळजी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. अशा सूचना करून मुसळधार पाऊस होत असल्याने शेतातील धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्य करू नये असे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असे आवाहन केले. 

सोलापूर जिल्ह्यामध्ये लोणार ता. मंगळवेढा येथील पांढरा कांदा हा प्रसिद्ध आहे. याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने याची पाहणी केली.

याप्रसंगी प्रदीप खांडेकर , शशिकांत चव्हाण, तानाजी काकडे , अंबादास कुलकर्णी,नितीन पाटील,सुरेश ढोणे, गौडाप्पा बिराजदार, जगन्नाथ रेवे,ब्रम्हदेव रेवे, काका मिस्कर, मच्छिंद्र खताळ,सचिन सोमूत्ते, गिरीश पाटील यशवंत खताळ, शहाजी गायकवाड सुनिल कांबळे बिरू घोगरे, बसू बिराजदार भारत ढगे चंदू पाटील तहसीलदार मदन जाधव साहेब कृषी अधिकारी मिसाळ मॅडम, म्हैसळ योजनेचे डेप्युटी इंजिनियर गोसावी साहेब, शाखा अभियंता श्री शिंदे साहेब भीमा पाटबंधारे विभागाचे डेप्युटी इंजिनियर जाधव साहेब शाखा अभियंता सरगर साहेब, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री नरळे साहेब सर्व सर्कल, तलाठी,ग्रामसेवक, कृषी सहाय्यक लाइनमन उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad