एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘सिंहगड हॅकेथॉन 2K25’ यशस्वीरित्या संपन्न* स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या धर्तीवर २४ तासांचे कोडिंग, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 *एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘सिंहगड हॅकेथॉन 2K25’ यशस्वीरित्या संपन्न*


स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या धर्तीवर २४ तासांचे कोडिंग, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग



पंढरपूर (प्रतिनिधी) | १९ सप्टेंबर २०२५


कोर्टी-पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागात आयोजित “ सिंहगड हॅकेथॉन 2K25 ” हा एकदिवसीय उपक्रम उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्णता, समस्या सोडवण्याची क्षमता आणि तांत्रिक कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी हा कार्यक्रम स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (SIH) च्या धर्तीवर राबविण्यात आला होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. विलास गाढवे (टेक महिंद्रा) यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे मूल्यांकन श्री. रूपेश रणवरे (ResumeX) आणि डॉ. विनायक जगताप यांनी केले. त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांना उद्योगस्नेही अभिप्राय देत नवकल्पनांना प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमात विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी २४ तास सातत्याने कोडिंग करत वास्तविक जगातील समस्यांवर नवोन्मेषी उपाय शोधले व सादर केले.

या एकदिवसीय हॅकेथॉन दरम्यान, सहभागींनी २४ तास सतत कोडिंगमध्ये भाग घेतला, वास्तविक जगातील समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय सादर केले. विजेता संघ - टीम अल्फा आणि उपविजेता संघ - टीम कोड ब्रेकर यांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, विभागप्रमुख डॉ. सुभाष पिंगळे, ACSES समन्वयक प्रा. सुमित इंगोले, आणि ACSES अध्यक्ष श्री. कुलदीप गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. 

प्रा. नामदेव सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना उद्योगाशी संबंधित प्रकल्पांवर काम करण्याची संधी, नवीन तंत्रज्ञान शिकण्याचा अनुभव, तसेच नेतृत्व, टीमवर्क आणि आत्मविश्वास वाढवण्याची संधी मिळाली.

‘सिंहगड हॅकेथॉन 2K25’ हे केवळ एक तांत्रिक स्पर्धा नसून विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वास्तवात उतरवणारे प्रभावी व्यासपीठ ठरले. 

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संगणक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad