*सांगोला येथील जिशान मुलाणी यांच्या संशोधनास इंग्लंडचे पेटंट बहाल*
सांगोला: प्रतिनिधी
सांगोला महाविद्यालयातील संगणक विभागात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी जिशान रशीद मुलाणी यांस इंग्लंड येथील बौद्धिक संपदा कार्यालयाकडून पेटंट बहाल करण्यात आले आहे. सांगोला सारख्या माणदेशी भागात जिशान मुलाणी विद्यार्थ्यांने शेती व उद्योग क्षेञात केलेल्या संशोधनामुळे सांगोला परीसरात त्यांचे कौतुक होत आहे.
भारत हा कृषी प्रधान देश आहे. शेतीला जोड धंदा म्हणून व्यवसायाकडे पाहिले जाते. शेती व उद्योग करत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कधी पाऊस वेळेवर न पडल्यानंतर दुष्काळ, कधी काळी जास्त पाऊस पडल्यावर अतिवृष्टी होऊन नुकसान होते. पीक जोमात आल्यावर अनेक वेळा किडीचा प्रादुर्भाव निर्माण होतो त्यामुळे शेती पिकांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शेतीतील उत्पादन यावरील उपाय म्हणून सांगोला महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. विदिन कांबळे आणि संगणक शास्त्र विभागातील विद्यार्थी जिशान रशीद मुलाणी यांनी विशेष असे कीटक पकडण्याचे उपकरण तयार केले आहे. या उपकरणामुळे डाळिंब पिकावरील रस शोषणाऱ्या पतंग व खोड किडे यांचा प्रतिबंध करण्यास मदत होणार आहे.
याशिवाय जमीन मधील हुमणी या अळीचा उपकरणामुळे प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे. त्यांच्या या पेटंट ची दखल घेऊन इंग्लंड येथील "बौद्धिक संपत्ती कार्यालय" यांचे पेटंट बहाल करण्यात आले आहे.
जिशान मुलाणी यांना पेटंट बहाल करण्यात आल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. जिशान मुलाणी हा सांगोला महाविद्यालयातील संगणक शास्त्र विभागातील विद्यार्थी असून त्यांनी अनेक प्रकल्प व संशोधन केले आहे.
जिशान मुलाणी यांच्या यशाबद्दल पिरसाब मुलाणी , रशीद मुलाणी, निसार मुलाणी, डॉ. विदिन कांबळे आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

