पंढरपूर सिंहगडच्या योगेश राऊत यांची ३ कंपनीत निवड
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेले मुंढेवाडी, ता. पंढरपूर येथील योगेश शंकर राऊत यांची ३ कंपनीत निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सर यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असतानाच योगेश शंकर राऊत यांचे, व्हीजन इंडिया सर्व्हिसेस, (वार्षिक पॅकेज 2.4 लाख), अदानी पॉवर लिमिटेड (वार्षिक पॅकेज 4 लाख), बजाज ॲटो लिमिटेड , पुणे (वार्षिक पॅकेज ३. 8 लाख) आदी 3 कंपनीत निवड झाली असून योगेश राऊत हे अदानी पॉवर लिमिटेड या कंपनीत मध्ये रुजू होणार आहेत.
अदानी पॉवर लिमिटेड ही बहूराष्टीय कंपनी अदानी समूहाचा एक भाग असून भारतातील सर्वात मोठा खाजगी थर्मल पॉवर उत्पादक आहे. या कंपनीचे गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड आणि तामिळनाडू येथील 11 पॉवर प्लांट्समध्ये 17,510 MW विशिष्ट थर्मल पॉवर क्षमतेची स्थापना केली आहे, ज्यात गुजरात येथील 40 MW सौर ऊर्जा संयंत्र देखील समाविष्ट आहे.
अशा या कंपनीत योगेश राऊत यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. दिपक गानमोटे, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. दत्तात्रय कोरके आदींसह आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

