पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात इ-यंत्र तांत्रिक सत्रमालिका यशस्वी*

 *पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात इ-यंत्र तांत्रिक सत्रमालिका यशस्वी*



पंढरपूर - आय.आय.टी. बॉम्बे द्वारे राबवण्यात येणाऱ्या e-Yantra Lab Setup Initiative (eLSI) अंतर्गत दरवर्षी विविध तांत्रिक सत्रांचे आयोजन केले जाते. याच उपक्रमांतर्गत, IIT बॉम्बेच्या e-Yantra Lab Setup Initiative (eLSI) अंतर्गत आयोजित ऑनलाइन तांत्रिक सत्रमालिका ही एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. ही सत्रमालिका २९ मे २०२५ ते २४ जुलै २०२५ या कालावधीत दर गुरुवारी दुपारी ०४:५० ते सायं. ०६:०० या वेळेत Webex प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन घेण्यात आली. हि तांत्रिक सत्रमालिका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उप प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. 

या सत्रांमध्ये द्वितीय वर्ष व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी विविध आधुनिक विषयांवर आधारित मार्गदर्शनाचा लाभ घेतला. या सत्रांमध्ये Introduction to Quadcopters, FPGA for Beginners, Linux Bash Scripting, Web Server Configuration with Nginx, Fundamentals of Control Systems, PID Controllers या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रांमुळे विद्यार्थ्यांमध्ये एम्बेडेड सिस्टीम्स, ॲटोमेशन आणि रोबोटिक्स क्षेत्रातील सखोल ज्ञानाची वाढ झाली.

कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून श्री. उदयकुमार फुले, श्री. अनिल जाधव, श्री. राहुल घोडके, सौ. सोनाली घोडके तसेच इ-यंत्र क्लब चे विद्यार्थी समन्वयक यांनी विशेष मेहनत घेतली. महाविद्यालयाच्या वतीने IIT बॉम्बे व इ-यंत्र टीमचे आभार मानण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad