*एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी*
पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती प्राचार्य डॉक्टर कैलास कारंडे व उपप्राचार्य डॉक्टर एस जी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. न्यायप्रिय, समाजकल्याणकारी, व महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या भरीव कार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक मंदिर, धर्मशाळा, तळी, विहिरी, पाणपोई, घाट आदी जनकल्याणकारी उपक्रमांची उभारणी केली. त्यांच्या वास्तुशिल्पाची वैशिष्ट्ये आजही अनेकांना प्रेरणा देणारी आहेत. विशेषतः महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार अत्यंत उल्लेखनीय आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. कैलास कारंडे सर व डॉक्टर एस जी कुलकर्णी सर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमातून उपस्थितांना अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे महत्वाचे संदेश मिळाले.

