मंगळवेढा येथील संताच्या स्मारकासाठी आ. समाधान आवताडे यांची लक्षवेधी संत बसवेश्वर आणि संत चोखोबा यांच्या स्मारकाचा निधी तातडीने देण्याचीही केली मागणी

 मंगळवेढा येथील संताच्या स्मारकासाठी आ. समाधान आवताडे यांची लक्षवेधी 



संत बसवेश्वर आणि संत चोखोबा यांच्या स्मारकाचा निधी तातडीने देण्याचीही केली मागणी 



पंढरपूर/प्रतिनीधी 



राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान विधिमंडळात पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार समाधान आवताडे यांनी विविध प्रश्नावर आवाज उठवला आहे. त्यातीलच एक भाग म्हणून मंगळवेढा शहरातील जगद़्ज्योती संत महात्मा बसवेश्वर महाराज तसेच संत चोखोबा महाराजांचे स्मारक उभारणी संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली.


 मंगळवेढा शहरात महात्मा बसवेश्वर महाराजांचे भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात यावे. 

श्री विठ्ठलाच्या पायरीशी एकरूप होणारे संत चोखोबा महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे. संत चोखामेळा महाराज संत परंपरेतील सर्वात महत्त्वाचे संत होते तर त्यांच्या कुटुंबात संत सोयराबाई संत निर्मळा संत बंका संत कर्ममेळा असे पाच संत होऊन गेले तसेच मंगळवेढा शहरात वारकरी संप्रदायातील संत दामाजीपंत, संत गोपाबाई, श्री स्वामी समर्थ, संत टीकाचार्य महाराज, संत सीताराम महाराज, मौनीबुवा यांसारखे अनेक थोर संत होऊन गेले, त्यामुळे येथे संतसृष्टी उभारण्यात यावी. अशी मागणीही आ. आवताडे यांनी केली आहे.

    महात्मा बसवेश्वर महाराजांच्या स्मारकाचा शासनाकडे प्रलंबित असलेला प्रस्ताव अधिवेशन संपण्यापूर्वी मंजूर करून आवश्यक निधी उपलब्ध करावा. याविषयी बोलताना त्याने मंगळयात असणाऱ्या त्यांच्या वास्तव्याबद्दल तसेच त्यांनी केलेल्या मंगळवेढ्यातील क्रांती कार्याबद्दल तसेच मंगळवेढ्यातील अनुभव मंडप चे स्थापनेविषयी विस्तृतपणे विवेचन केले महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीदिनी भूमिपूजन करणार का? असा सवालही सरकारला विचारत अधिवेशन संपण्याआधी संत चोखोबा महाराजांच्या स्मारकाचा प्रस्ताव मागवून त्यासाठी निधी मंजूर करण्यात येईल का? असेही विचारण्यात आले.


आ आवताडे यांचे मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत, सोलापूरचे पालकमंत्री व राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी येत्या महिन्याभरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या स्मारकासाठी जागा निश्चिती करून निधी मंजूर करणार असल्याचे स्पष्ट केले. यासोबतच संत चोखोबा महाराजांच्या स्मारकासाठी प्रस्तावित जागा उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही स्मारकास उभा करण्याच्या दृष्टीने संबंधित लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी यांच्या सहसंयुक्त बैठक घेऊन या स्मारकाचा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले..


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad