रेवसा येथे पूर्व गर्भलिंग परीक्षण व तंत्रज्ञान च्या कायद्याचे मार्गदर्शन मेळावा संपन्न
अमरावती - महानगर पालिका व विधीप्राधिकरण तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय च्या वतीने अमरावती पासून जवळच असलेला रेवसा ह्या ग्रामीण क्षेत्रात संत ब्रम्हचारी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सव मध्ये विविध महाविद्यालय मधील विद्यार्थ्याने मलकांब चे प्रत्याक्षीक दिले , गर्भलिंग परीक्षण करू नये त्या बाबत सामाजिक महाविद्यालय मधील महिला विद्यार्थिनीने पथ नाट्य केले मुल - मुली एक समान कसे असतात त्या चे प्रात्याक्षिक दाखवण्यात आले ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संत अचुत महाराज यांचे शिष्य संत सचिन देव महाराज यांनी भूषवले कार्यक्रमाचे मार्गदर्शन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दिलीप सोंदळे यांनी कुठेही गर्भलिंग परीक्षण होत असेल तर तत्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात कळवावे किंवा दिलेल्या हेल्प लाईन नंबर व माहिती दयावी, तसेच डॉ विशाल काळे आरोग्य अधिकारी मनपा यांनी सुद्धा मार्गदर्शन केले की कुटुंबातील कोणी व्यक्ती गर्भवती स्त्री ला मुलगा आहे की मुलगी तपासणी साठी तगादा लावत असेल किंवा त्रास देत असेल त्यांची तक्रार महानगर पालिकेच्या तक्रार निवारण केंद्राला देण्यात यावी ,त्यांनतर डॉ रुपेश खडसे साथ रोग नियंत्रण अधिकारी मनपा यांनी सुद्धा महिलांना व मेळाव्यातील जनतेला संबोधित केले की बेटी बचाव बेटी पढाव मुलगी शिकली तर दोन कुटुंब परिवाराचे उध्दार होतो असे सांगितले कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे अध्यक्ष जयंतराव केंद्रेरे यांनी केले असून ह्या विशेष उपस्थित विधी प्राधिकरण चे न्यायदिश, जिल्हा विधी सल्लागार ऍड. भाकरे ,देवेंद्र बायसकर,व विविध महाविद्यालय येथील प्राचार्य उपस्थित होते शेकडो महिलांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घेतला