सिंहगड स्टाफ स्पोर्ट्स लीग 2024-25 ची दिमाखात सुरुवात .

 

सिंहगड स्टाफ स्पोर्ट्स लीग 2024-25 ची दिमाखात सुरुवात ...


पुणे / प्रतिनिधी 



सिंहगड कॉलेज, लोणावळा स्पोर्ट्स लीग ची आजपासून सुरुवात झाली, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा आणि सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पुणे यांच्यातर्फे आयोजित क्रिकेटचा उदघाटन सोहळा पार पडला . सिंहगड स्टाफ स्पोर्ट्स लीग मध्ये विविध खेळांचा समावेश आहे. 8 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत सिंहगड संस्थेची २० हुन अधिक महाविद्यालये सहभागी होत आहेत. या स्पर्धांमध्ये क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन, लॉन टेनिस, बुद्धिबळ आणि पोहणे यांचा समावेश आहे. सिंहगड स्टाफ स्पोर्ट्स लीग ची सुरुवात क्रिकेट या स्पर्धेने झाली.

या सोहळ्याचे उद्घाटन लोणावळा सिंहगड संकुलाचे संचालक डॉ.एम.एस.गायकवाड व कमलापूर सिंहगड संकुलाचे संचालक अशोक नवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोणावळ्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ.एस.डी.बाबर, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे ऍण्ड सायन्स प्राचार्य डॉ.एम.एस.रोहोकले, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेसचे प्राचार्या डॉ.रुक्साना पिंजारी, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या, डॉ. अंजली चॅटर, डॉ., निवृत्ती बाबाजी नवले कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ आणि विज्ञान डॉ.व्ही.बी.ढोले, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ॲण्ड कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्सचे संचालक डॉ.विद्या नखाते, सिंहगड पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ.एन.के.मिश्रा, काशीबाई नवले शिक्षण व प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी देसाई, शारीरिक शिक्षण संचालक कुमार आदाटे व स्पर्धेसाठी आलेल्या संघ हि उपस्थित होते.

यावेळी लोणावळा सिंहगड संकुलाचे संचालक डॉ. एम.एस. गायकवाड म्हणाले, कर्मचाऱ्यांसाठी खेळ महत्त्वाचे आहेत कारण ते शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा करू शकतात, मनोबल वाढवू शकतात, सांघिक कार्य आणि सहकार्य वाढवू शकतात. 

आज ठरलेल्या वेळापत्रकानुसार पाच महाविद्यालयांमध्ये क्रिकेटचे सामने झाले. पहिल्या सामन्यात एससीओई किंग्ज आणि एसपीएस सोलापूर लायन्स यांच्यात पहिला क्रिकेट सामना झाला. यामध्ये एसपीएस सोलापूर लायन्सचा विजय झाला. दुसरा सामना एसव्हीसीपी टायटन्स आणि एसकेएनपी सिनर्जी यांच्यात झाला. तिसरा सामना SCOS चॅम्पियन्स आणि SCOP Gladiators यांच्यात झाला, ज्यामध्ये SCOP Gladiators संघ विजयी ठरला . चौथा सामना RMD SIC आणि SIHPCS सुपर किंग्ज यांच्यात SIHPCS सुपर किंग्ज संघ विजयी ठरला आणि पाचवा सामना SCOE Fighters आणि SIT Eagles यांच्यात होता, ज्यामध्ये SIT Eagles विजयी ठरला.दुसऱ्या दिवसासाठी इतर संघ तयारी करत आहेत.




आपल्या भागातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क संपादक -गणेश गांडुळे मो-7972599550

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad