अनिल सावंत हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार; पक्ष ताकदीनिशी पंढरपूर मंगळवेढ्याची जागा लढवणार-अमोल कोल्हे...
भगीरथ हे काँग्रेसचेच उमेदवार आहेत का काँग्रेसने तपासून पहावं; अमोल कोल्हेंचा हल्लाबोल...
सोलापूर प्रतिनिधी
मतदारांनी कोणतीही संभ्रमात बाळगण्याचे कारण नाही. पंढरपूर मंगळवेढ्याची जागा आमची आहे. अनिल सावंत हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत.पवार साहेब,जयंत पाटील, आणि सुप्रिया सुळे या तिघांपैकी कोणाची सभा घ्यायची याचे नियोजन सुरू आहे. पवार साहेब या मतदारसंघात सभा घेणार नाहीत, ही अफवा आहे. मतदारांनी यावर विश्वास ठेवू नये. जयंत पाटील पवार साहेब आणि सुप्रिया सुळे यांच्या पैकी कोणाची सभा कधी घ्यायची, याचे नियोजन सुरू असून राष्ट्रवादी पंढरपूर मंगळवेढाची जागा पूर्ण तकतीनिशी लढते आहे.खरंतर भगीरथ भालके हे उमेदवार काँग्रेसचेच आहेत का, हे काँग्रेसने तपासणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी मधून बीआरएस पक्षात गेले, आणि बीआरएस मधून आता काँग्रेसमध्ये आले आहेत. सगळ्या पक्षातून फिरून आलेल्या उमेदवारांना निवडणुकीमध्ये लोकचं योग्य उत्तर देतील.
राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येणार याची खात्री आहे. शेतकरी हवालदिल झालाय, तरुण बेरोजगार आहे, अनेक प्रकल्प गुजरातला जातायत. पण बाहेरचा एकही प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आला नसल्याचं अमोल कोल्हे म्हणाले.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेसचाही उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये कोणतीही संभ्रमता राहू, नये यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते.
या पत्रकार परिषदेदरम्यान नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक प्रताप, संतोष नेहेतराव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, समाजसेवक अर्जुन पवार सामाजिक कार्यकर्ते आणि आरपीआय शहराध्यक्ष समाधान लोखंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरज गंगेकर, सामाजिक कार्यकर्ते अभिषेक गंगेकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब असबे, सक्षम गंगेकर राजश्री गंगेकर, संतोष नेहेतराव सुरेश नेहेतराव, बाळासाहेब नेहेतराव, आदी विविध पदाधिकारी आणि दहा नगरसेवकांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला.
यावेळी विविध पदाधिकारी आणि दहा नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानताना अनिल सावंत म्हणाले, महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून, मला पाठिंबा देणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांचे मनापासून आभार आणि धन्यवाद. येणाऱ्या काळात निश्चितपणे आपण सोबत काम करू, तुमच्या येण्याने या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढली आहे.