साहेबांच्या निर्णयाची वाट न बघणाऱ्या उमेदवाराला त्यांची जागा दाखवा; जयंत पाटलांची भगीरथ भालकेंवर

 साहेबांच्या निर्णयाची वाट न बघणाऱ्या उमेदवाराला त्यांची जागा दाखवा; जयंत पाटलांची भगीरथ भालकेंवर सडकून टीका..


अनिल सावंतांना पवार साहेबांचा आशीर्वाद; साहेबांचा अपमान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, भालकेंवर जयंत पाटलांची सडकून टीका...




छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवतीर्थ पंढरपूर या ठिकाणी आज शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जाहीर सभा पार पडली. पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. 


या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, प्रा. लक्ष्मण ढोबळे साहेब, पक्ष निरीक्षक शेखर माने साहेब, रवी पाटील , वसंत नाना देशमुख , सुभाष दादा भोसले, अमर सूर्यवंशी, रवी मुळे, डॉ संजयकुमार भोसले, संतोष नेहतराव आणि त्यांच्ये बंधू,आसबे साहेब , गंगेकर साहेब, ,संदीप मांढवे, सुधीर भोसले ,सुधील अभंगाराव, राहुल भैय्या शाह , प्रथमेश पाटील , चंद्रशेखर कोंडुबहिरे, दिपकदादा वाडदेकर सागर पडगळ, संजय शिंदे सर, मुन्ना भोसले, कसबे साहेब, घोडके साहेब, महिला आघाडीच्या पदाधिकारी सुवर्णाताई शिवपुरे, पूनम अभंगराव, राजश्री ताड, वृषाली इंगळे, शुभांगी ताई, साधना राऊत , चारुशीला कुलकर्णी, पूर्वा ताई, अनिता पवार ,सुनंदा उमाटे , रेखा ताई, काजल भोरकडे, डॉ श्रीमंत कोकाटे सर आदी मान्यवर आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.


उपस्थित मतदार आणि नागरिकांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि सावंत हेच आहेत. भगीरथ भालके यांनी पवार साहेबांकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिली होती. मात्र पवार साहेबांनी निर्णय घ्यायचा अगोदरच त्यांनी वेगळी भूमिका घेतली. पवार साहेबांच्या निर्णयाची वाट बघणाऱ्या उमेदवाराला त्याची जागा दाखवण्याची ही वेळ आहे. 


देशात प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, महागाई, शेतकरी संतप्त आहे. मात्र या मूलभूत समस्यांकडे बघायला भाजपला वेळ नाही. भाजप फक्त जाती धर्मांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहे. 


देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणतात, बटेंगे तो कटेंगे त्यांना सांगितलं पाहिजे बटेंगे तो कटेंगे नाही, पढेंगे तो बचेंगे.

म्हैसाळच्या पाण्याचा प्रश्न आम्ही सोडविणार. मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न आमचेच सरकार सोडवणार. समोर जरी काँग्रेसचा उमेदवार असला तरी या लढतीचे विश्लेषण करायचं झालं तर ही मैत्रीपूर्ण लढत होईल. मात्र अनिल सावंत यांना शरद पवारांचे आशीर्वाद आहेत, ते विसरू नका.


अनिल सावंत म्हणाले, साहेब तुम्ही उमेदवार देऊन माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो विश्वास मी सार्थक करून दाखवणार. मला कोणावर टीका करायची नाही. एक परिचारिकांच्या जीवावर आमदार झालेला व्यक्ती आहे. दुसरे आपल्या सहकार पक्षातले उमेदवार हे नेहमी नॉटरीचेबाल असतात. 


या मतदारसंघात विद्यमान आमदार सांगतात 3000 कोटीची कामे केली, मात्र हे केवळ मोठमोठे आकडे सांगतात त्यांची कामे फक्त कागदावर आहेत पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात आणि काही लोकांना अंतर्गत रस्ते आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.

मी आपल्याला विनंती करतो, तुम्ही जुना कामचुकार सालगडी बदला आणि कामाचा नवीन सालगडी निवडून आणा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad